Kalyan Crime News : अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर घटनास्थळी घडला थरार, तरुणावर गुन्हा दाखल

या प्रकरणी पाेलिसांनी संशयिताची कसून चाैकशी करावी अशी मागणी हाेत आहे.
Kalyan Crime News
Kalyan Crime NewsSaam tv

- अभिजित देशमुख

Kalyan News : एकतर्फी प्रेमातून एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्व तिसगाव परिसरात काल रात्रीच्या सुमारास घडली होती. धक्कादायक म्हणजे हल्ल्यानंतर संशयिताने स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मुलावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पाेलिसांनी दिली.(Maharashtra News)

Kalyan Crime News
Tomato Price Drop In Nashik : बाजार समितीत टाेमॅटाेचा दर काेसळू लागला, जाणून घ्या महत्त्वाचे कारण

कल्याण पूर्व तिसगाव परिसरात राहणाररी बारा वर्षे अल्पवयीन मुलगी काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आपल्या आईसोबत घरी जात होती. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या आवारात पोहोचली जिना चढत असताना एका तरुणाने या मुलीवर चाकूने हल्ला केला.

Kalyan Crime News
Bhandara News : 47 काेटींच्या पाणीपुरवठा योजनेचा बाेजवारा, टॅंकरमुक्त तुमसर केव्हां हाेणार?

अत्यंत निर्दयपणे तरुणाने तिच्यावर सहा ते सात वेळा चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Kalyan Crime News
Shravan Maas 2023: श्रावणात केळीचा दर भडकणार? शेतकरी सुखावला, कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला उच्चांकी भाव

दरम्यान हल्ला करून हल्लेखोर पळून जात असताना नागरिकांनी त्याला पकडलं व पोलिसांच्या स्वाधीन केले. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संशयिताचे नाव आदित्य कांबळे असे आहे. हल्ला करून पळून जात असताना त्याने फिनायल प्राशन केलं. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली.

त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून आदित्य हा अल्पवयीन मुलीच्या मागावर होता. या मुलीने नकार दिल्याने एकतर्फी प्रेमातून आदित्यने तिच्यावर चाकूने हल्ला केला.

Kalyan Crime News
Jaysingpur Crime News : फिल्मी स्टाइल अपहरणाने काेल्हापुरात 'सत्या'ची चर्चा, ज्वेलर्सच्या मालकसह पुतण्याचा शाेध सुरु

याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी आदित्य कांबळे विरोधात गुन्हा दाखल करत या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे अशी माहिती महेंद्र देशमुख (कोळसेवाडी पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com