Nandkumar Nanaware And His Wife, Thane, Satara, Ulhasnagar Saam Tv
महाराष्ट्र

Nandkumar Nanavare Case : नंदकुमार ननावरे आत्महत्या प्रकरणी चौघे पोलिसांच्या ताब्यात, राजकीय वर्तुळात खळबळ

या प्रकरणाचा छडा लागावा यासाठी ननावरे यांचे बंधू आक्रमक झाले आहेत.

Siddharth Latkar

विकास काटे/ अजय दुधाणे

Nandkumar Nanavare Case : दिवंगत माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक पीए नंदकुमार ननावरे यांच्या आत्महत्या प्रकरणी ठाणे क्राईम पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. या चाैघांना पाेलिसांनी उल्हासनगर आणि अंबरनाथ येथून ताब्यात घेतल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

दिवंगत माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक पीए नंदकुमार ननवरे आत्महत्या प्रकरणाला आता वेगळच वळण आले आहे. आत्महत्येला वीस दिवस उलटूनही कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने नंदू ननावरे यांचे भाऊ धनंजय ननावरे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकला आहे.

या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्याला त्रास दिला जात असल्याचा सांगितलं आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणातल्या संशयित आरोपींमध्ये मोदी सरकारमधील एक व्यक्ती असल्यामुळे कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचा आरोप केला.

या संपूर्ण घटनेनंतर सरकारला जाग यावी यासाठी धनंजय ननावरे यांनी आपले स्वतःचे बोट छाटून घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल केला. तसेच जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आपला एक एक अवयव फडणवीस यांना छाटून पाठवणार असल्याचा व्हिडिओत सांगितले.

त्यानंतर ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने उल्हासनगर येथून चार लोकांना ताब्यात घेतले. यामध्ये आमदार बालाजी किणीकर (mla balaji kinikar) यांचे स्विय सहाय्यक शशिकांत साठे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन युवा पदाधिकारी कमलेश निकम आणि नरेश गायकवाड तसेच शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे महाराष्ट्र राज्य विस्तारक गणपती रामा कांबळे यांचा समावेश आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सतेज पाटलांची पत्रकार परिषद

'मला धमकी देऊ नका,मीही पाटील आहे'; सतेज पाटलांचा चंद्रकांतदादांना सणसणीत टोला

Rohit Sharma Video: रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार; मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूच्या त्या 2 शब्दांनी शिक्कामोर्तब

'गोकुळ'च्या राजकारणात मोठा भूकंप! सतेज पाटलांचा खळबळजनक दावा, ४ संचालकांवरून कोल्हापूरमध्ये वातावरण तापणार

EPFO Pension Hike : ईपीएफओ पेन्शनर्ससाठी मोठी खूशखबर! सरकार घेणार मोठा निर्णय; लवकरच वाढणार किमान पेन्शन

SCROLL FOR NEXT