'मला धमकी देऊ नका,मीही पाटील आहे'; सतेज पाटलांचा चंद्रकांतदादांना सणसणीत टोला

Satej Patil Warn Chandrakant Patil : 'मला धमकी देऊ नका, मीही पाटील आहे,' असे म्हणत सतेज पाटील यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना सणसणीत उत्तर दिले. गोकुळ अध्यक्ष निवडणुकीनंतर हसन मुश्रीफ यांच्यावरही त्यांनी टीका केली.
Satej Patil's strong response to Chandrakant Patil
Satej Patil's strong response to Chandrakant Patilsaam tv
Published On: 
Summary
  • कोल्हापूरच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

  • सतेज पाटील यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका

  • चंद्रकांत पाटील यांची वैचारिक पातळी घसरत असल्याची टीका

चंद्रकांत दादा जेवढे मोठे होत आहेत तेवढी त्यांची वैचारिक पातळी खाली जातेय.दादा आता धमकी देत आहेत, मी पण पाटील आहे, असं सणसणीत उत्तर देत सतेज पाटील यांनी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकात पाटील यांना इशारा दिलाय. पाटलांसह सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनाही सडेतोड उत्तर दिलंय. ते अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्याचं लक्ष लागलेल्या गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदासाठी अखेर आज निवडणूक प्रकिया संपन्न झाली. निवडणुकीनंतर महायुतीकडे अध्यक्षपद गेलं. माजी आमदार राजेश पाटील यांच्या गळ्यात गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ पडली. त्यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून आमदार सतेज पाटलांवर जोरदार टीका केली गेली. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणातून आणीबाणीच्या आठवणी सांगत काँग्रेस आणि बंटी पाटलांवर बोचरी टीका केली.

Satej Patil's strong response to Chandrakant Patil
Kolhapur Gokul Election: गोकुळमध्ये राजकीय घडामोडींना वेग; अध्यक्षपदासाठी 'या' नेत्याच्या नावाची जोरदार चर्चा

आणीबाणी आणली तुम्ही, २० लाख लोकांना तुरुंगात टाकलं तुम्ही. बोलायचं नाही अटक, लिहायचं नाही अटक, मोर्चा काढला अटक... १९ महिने लोक तुरुंगात होते. तू आता आम्हाला लोकशाही शिकवणार, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी काँग्रेससह बंटी पाटलांवर हल्लाबोल केला होता. बंटी पाटील यांनी १५ दिवस फक्त महायुतीला शिव्या दिल्या, खोटे नरेटिव्ह पसरवले. एखाद्या लहान मुलाला खेळणं मिळालं नाही की, ते हातपाय आपटतं, त्रागा करतं, आईला बोचतं, तसेच बंटी पाटील करत होते.

Satej Patil's strong response to Chandrakant Patil
Gokul President Election: मतदान आणि निकाल एकाच दिवशी लागणार! गोकुळच्या अध्यक्ष निवडणुकीवर हायकोर्टाचा मोठा निर्णय

बंटी पाटील हे त्यांच्या नावाप्रमाणे बंटीच राहिले, त्यांचा बंटी साहेब झालाच नाही. अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. चंद्रकात पाटलानंतर गोकुळचे नवे अध्यक्ष राजेश पाटील यांनीही सतेज पाटील यांच्यावर टीका केली. महायुतीच्या नेत्यांना उत्तर देण्यासाठी आणि आपली पुढील रणनीती काय असेल याची माहिती देण्यासाठी सतेज पाटील यांनी दुपारी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी बोलताना सतेज पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. गोकुळ अध्यक्षपदाचं निवडणूक घेणं हे जनमताचा अपमान आहे. या निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्यात आला. चंद्रकांतदादा जेवढे मोठे होत आहेत तेवढी त्यांची वैचारिक पातळी खाली जात आहे. स्वर्गीय डी. वाय. पाटील यांच्या बदल त्यांनी का बोलावं.

हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर दबाव आणला. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना खेचण्याचं काम नव्हतं. परंतु या दोघांनी त्यांच्यावर दबाव आणला. चंद्रकांत पाटील दादा आता धमकी देत आहेत मी पण पाटील आहे. उलटा निकाल लागला तर प्रशासक आणून असं म्हणाले होते. धमकी देण्याचे परिणाम भविष्यात भोगावे लागतील, असं इशारा सतेज पाटील यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.