Rohit Sharma Video: रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार; मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूच्या त्या 2 शब्दांनी शिक्कामोर्तब

India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंडमधील तिसरा वनडे सामना पावसामुळे रद्द झाला. मात्र, रोहित शर्मा आणि मिशेल सॅन्टनर यांच्यातील 'हॅलो कॅप्टन' संवाद चर्चेत आला आहे. या संवादामुळे रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार होणार का, अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे.
Rohit Sharma Video
Rohit Sharma Videosaam tv
Published On: 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला. पण सामना रद्द झाल्यानंतर मैदानावर असा एक प्रसंग घडला, ज्याने चाहत्यांची मनं जिंकली. भारताचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा आणि न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सॅन्टनर यांच्यातील संवाद सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. यामुळे रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

रोहित शर्मा आणि सॅन्टनरमध्ये नेमकं काय घडलं?

हॅमिल्टनमधील सेडन पार्कवर पावसामुळे सामना रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर दोन्ही टीमचे खेळाडू एकमेकांशी हँडशेक करण्यासाठी मैदानात आले. यावेळी रोहित शर्मा आणि मिशेल सॅन्टनर यांची भेट झाली.

रोहितने हसत सॅन्टनरला त्याच्या टोपणनावाने म्हणजेच 'मिची' अशी हाक मारली. त्यावर सॅन्टनरनेही लगेच उत्तर दिलं, 'हॅलो, कॅप्टन'. त्यानंतर रोहितने 'थँक्स, मॅन' असं म्हणत त्याचे आभार मानले.

Rohit Sharma Video
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचं पुन्हा नशीब चमकलं! मिळाली टी-२० टीमची कॅप्टन्सी, आता दोन ट्रॉफी जिंकण्याचं लक्ष्य

रोहित शर्मा पुन्हा होणार कर्णधार?

या दोघांमधील या संभाषणामुळे गेल्या काही दिवसांपासून ज्या चर्चा रंगतायत त्या खऱ्या ठरणार का असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा पुन्हा कर्णधार होणार अशा पोस्टही व्हायरल होतात. न्यूझीलंडचा खेळाडू मिचेल सॅन्टनर देखील मुंबई इंडियन्सचा खेळाडू आहे. त्यामुळे त्यांच्या या संभाषणाने रोहित पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार होणार या शक्यता दाट झाल्या आहेत.

पावसामुळे सामना रद्द, पाच तास पंचांची प्रतीक्षा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या सामन्यात पावसाने खेळाचा पुरता विचका केला. टॉस ठरलेल्या वेळेपेक्षा जवळपास दोन तास उशिराने झाला. टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

Rohit Sharma Video
IND vs NZ 2nd ODI: पावसाचा खेळ, न्यूझीलंडचा गेम; अटीतटीच्या सामन्यात हरता हरता जिंकली टीम इंडिया

पाऊस आणि वेळेची कमतरता पाहता हा सामना प्रत्येकी ४० ओव्हर्सचा खेळवला जाण्याची शक्यता होती. पण टॉसची प्रक्रिया पूर्ण होताच पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतलीच नाही. अंपायर्सने तब्बल पाच तास हवामान सुधारण्याची वाट पाहिली. पण पाऊस थांबण्याची चिन्हं दिसली नाहीत. अखेर एकही चेंडू न टाकता सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.