IND vs NZ 2nd ODI: पावसाचा खेळ, न्यूझीलंडचा गेम; अटीतटीच्या सामन्यात हरता हरता जिंकली टीम इंडिया

India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वेलिंग्टनमध्ये खेळवण्यात आलेला दुसरा वनडे सामना पावसामुळे थांबवण्यात आला. DLS नियमानुसार टीम इंडियाने ४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने वनडे मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
IND vs NZ 2nd ODI
IND vs NZ 2nd ODIsaam tv
Published On: 

वेलिंग्टनमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यावर पावसाचं सावट पाहायला मिळालं. या सामन्यात पावसाने वारंवार व्यत्यय आणल्याने अखेर अंपायर्सना सामना थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला. मुसळधार पावसामुळे सामना पुढे खेळवणं शक्य नसल्याने अखेर हा सामना रद्द करण्यात आला. डकवर्थ लुईस (DLS) नियमानुसार टीम इंडियाने ४ रन्सने हा सामना जिंकला आहे.

वेलिंग्टनमध्ये पावसाचा जोर इतका वाढला की मैदानावर खेळ सुरू ठेवणं अशक्य झालं. अखेर अंपायर्सने सामना रद्द झाल्याचं घोषित केलं. अगदी अटीतटीच्या परिस्थितीत भारताने अवघ्या ४ रन्सने बाजी मारली. या विजयामुळे टीम इंडियाने या सिरीजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.