भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा; न्यूझीलंडची फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली, अवघ्या १३४ धावांत ऑलआऊट

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा पाहायला मिळाला. गुरनूर ब्रारने ४ विकेट्स घेतल्या, तर न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १३४ धावांत ऑलआऊट झाला. भारतासमोर विजयासाठी १३५ धावांचे लक्ष्य.
ind vs nz 2nd ODI live score
ind vs nz 2nd ODI live score
Published On: 

ind vs nz 2nd ODI live score : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. वेलिंग्टन येथे सुरू असलेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत न्यूझीलंडचा डाव अवघ्या १३४ धावांवर संपुष्टात आणला. गुरनूर ब्रारच्या माऱ्यापुढे न्यूझीलंडचे फलंदाज अपयशी ठरले. न्यूझीलंडकडून चॅरेल मिचेल याने सर्वाधिक धावा केल्या. भारताला विजयासाठी ४७ षटकात १३५ धावांचे आव्हान आहे.

किवी संघाची खराब फलंदाजी:

ढगाळ वातावरण आणि गोलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या पिचचा फायदा घेत भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच न्यूझीलंडच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलने सर्वाधिक ५५ धावांची झुंज दिली. तर कर्णधार मिचेल सँटनरने ३१ धावांचे योगदान दिले. मात्र, इतर फलंदाज भारतीय डावापुढे टिकू शकले नाहीत आणि संपूर्ण संघ ४१ षटकांत १३४ धावांवर ऑलआऊट झाला. पावसामुळे हा सामना प्रत्येकी ४७ षटकाचा होत आहे.

ind vs nz 2nd ODI live score
Sharad Pawar Health Update: शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; आता प्रकृती कशी आहे?

भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा

भारताकडून युवा गोलंदाज गुरनूर ब्रार याने अत्यंत घातक गोलंदाजी करत ४ बळी टिपले आणि न्यूझीलंडच्या डावाला खिंडार पाडले. त्याच्याशिवाय अंशुल कंबोज, औकिब नबी आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २-२ महत्त्वपूर्ण विकेट्स घेत त्याला सुरेख साथ दिली.

आता न्यूझीलंडने दिलेले १३५ धावांचे अल्प लक्ष्य पार करून मालिकेत आघाडी घेण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.