६१ तासांनंतर चक्काजाम आंदोलन स्थगित! राजू शेट्टींची मोठी घोषणा, ऊस दराबाबत अखेर तोडगा; पाहा शेतकऱ्यांना किती मिळणार?

महाराष्ट्रातील ऊस दरावरून सुरू असलेले ६१ तासांचे चक्काजाम आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. बैठकीत प्रतिटन ३,९०० रुपये पहिली उचल, चालू हंगामासाठी १०० रुपये अतिरिक्त आणि साखरेचे दर वाढल्यास आणखी २०० रुपये देण्याचा फॉर्म्युला मान्य झाल्याचे राजू शेट्टी यांनी जाहीर केले.
Raju Shetti addressing farmers after the sugarcane price agreement at Kini Toll Plaza in Maharashtra.
Raju Shetti Announces End of 61-Hour Sugarcane Price Protest
Published On: 

रणजित माजगावकर, कोल्हापूर प्रतिनिधी

Swabhimani Shetkari Sanghatana latest update : पश्चिम महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांपासून ऊस दरावरून सुरू असलेला पेटता संघर्ष अखेर शमला आहे. तब्बल ६१ तासांच्या प्रदीर्घ आणि आक्रमक चक्काजाम आंदोलनानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले आंदोलन स्थगित करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. किणी टोल नाका येथे पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ऊस दरावर सर्वमान्य तोडगा निघाल्यानंतर स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.

४२०० रुपयांच्या मागणीवर 'हा' निघाला तोडगा:

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रतिटन ४२०० रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी महामार्गावर ठिय्या आंदोलन मांडले होते. अखेर कारखानदारांनी खालीलप्रमाणे नव्या फॉर्म्युल्याला मान्यता दिली आहे.

पहिली उचल: प्रतिटन ३,९०० रुपये थेट दिले जातील.

हंगामासाठी अतिरिक्त: चालू हंगामाकरिता अधिकचे १०० रुपये दिले जातील.

साखरेचे दर वाढल्यास: भविष्यात साखरेचे बाजारभाव वाढल्यास आणखी २०० रुपये अतिरिक्त दिले जातील.

Raju Shetti addressing farmers after the sugarcane price agreement at Kini Toll Plaza in Maharashtra.
मोठी बातमी! तिसऱ्या अपत्याचा नियम रद्द होणार? महाराष्ट्रातील सरपंचांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल

आजचा बंदही मागे, वाहतूक पूर्ववत:

किणी टोल नाक्यावर हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, "शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे आणि संघर्षा मुळेच कारखानदारांना हा निर्णय घ्यावा लागला आहे. मागणीनुसार तोडगा निघाल्याने शुक्रवारी पुकारण्यात आलेला 'महाराष्ट्र बंद' देखील आता स्थगित करण्यात येत आहे."

Raju Shetti addressing farmers after the sugarcane price agreement at Kini Toll Plaza in Maharashtra.
2027 ठरवणार देशाचं राजकीय भवितव्य! उत्तर प्रदेशसह 'या' 7 राज्यांत विधानसभेचा महासंग्राम

वाहतूक आणि साखर हंगामाला गती मिळणार:

गेल्या ६१ तासांपासून पुणे-बेंगलोर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती, ज्यामुळे प्रवासी आणि वाहनधारकांचे मोठे हाल होत होते. आता आंदोलन मागे घेण्यात आल्याने महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. तसेच, दर ठरल्याने गेल्या काही दिवसांपासून बंद असलेले साखर कारखाने आता पूर्ण क्षमतेने सुरू होऊन ऊस गाळप हंगामाला गती मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.