Satej Patil latest statement on Gokul Milk Union politics : गोकुळ दूध संघाच्या (Gokul Milk Union) सत्तापालटानंतर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर सत्तेचा आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा घणाघाती आरोप केला आहे. अध्यादेश काढून या राज्यात काहीही होऊ शकतं, पण भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा सतेज पाटील यांनी दिला आहे.
'त्या' ४ संचालकांची नेमणूक फक्त मतदानापुरतीच?
गोकुळमधील नव्या घडामोडींवर भाष्य करताना सतेज पाटील यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. ४ शासननियुक्त संचालकांची नेमणूक फक्त ३ महिन्यांसाठीच करण्यात आल्याची माहिती मिळाल्याचे सतेज पाटील म्हणाले.
त्या ४ संचालकांचा वापर फक्त मतदानापुरता केला जात आहे. नंतर जे पडले (पराजित झाले) आहेत त्यांना पुन्हा मागच्या दाराने आत घेतले जाईल, असा गुप्त कट असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला.
न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास
शासकीय अध्यादेश आणि राजकीय दबावाच्या या लढाईत सतेज पाटील यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला आहे. "माझा देशातील न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. देशातील न्यायालये अतिशय चांगले काम करत असून या प्रकरणात नक्कीच न्याय मिळेल," असे सतेज पाटील म्हणाले.
सतेज पाटील यांच्या या वक्तव्यामुळे गोकुळच्या सत्ताकारणावरून कोल्हापुरातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.
चुकीच्या कामाला विरोध करणारच
माध्यमांशी बोलताना सतेज पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "गोकुळमध्ये जर शेतकरी हिताचे आणि चांगले निर्णय झाले, तर आम्ही त्याला अजिबात विरोध करणार नाही. मात्र, कुठेही चुकीची कामे झाली, तर त्याला आमचा विरोध कायम असेल," असे त्यांनी ठणकावून सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.