HSC saam tv
महाराष्ट्र

HSC Exam 2024 : इंग्रजी पेपरला परभणी जिल्ह्यातील 953 विद्यार्थ्यांची दांडी, 20 जणांना काॅपी करताना पकडलं

काॅपीमुक्त अभियानाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त आणि सुरक्षेच्या वातावरणात राज्यात बुधवारपासून इयत्ता बारावीची परीक्षा सुरू झाली.

Siddharth Latkar

अक्षय बडवे / राजेश काटकर

HSC Exam News :

राज्यात बुधवारपासून सुरु झालेल्या इयत्ता बारावीची परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी पेपर (hsc exam english subject paper) देताना काॅपी आणि संबंधित गैरप्रकाराची ५८ प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये परभणी जिल्ह्यात 20 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. याबराेबरच परभणी जिल्ह्यातील 953 विद्यार्थ्यांनी इंग्रजी पेपरला दांडी मारल्याची माहिती शिक्षण विभागातून मिळाली. (Maharashtra News)

परभणी जिल्ह्यात 69 परीक्षा केंद्रांवर बुधवारी बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर झाला. इंग्रजी विषयाच्या पेपरला 953 विद्यार्थ्यांनी दांडी मारली तर इसाद येथील श्री बालाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर तब्बल 20 विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले.

इयत्ता बारावीच्या परीक्षेत कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी राज्यात भरारी पथकासह अन्य पथकेही तैनात करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांची कसून तपासणी करुन त्यांना परीक्षा केंद्रात सोडण्यात आले होते. असे असतानाही राज्यात इंग्रजीच्या पेपरला कॉपी करण्याची ५८ प्रकरणे समाेर आली आहेत.

विभागनिहाय काॅपी प्रकरणे

पुणे – १५

छ. संभाजीनगर-२६

नाशिक – २

लातूर – १४

नागपूर – १

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: सलमानच्या बिग बॉसमध्ये लागणार तडका; किम कार्दशियन घेणार वाइल्डकार्ड एन्ट्री?

VIDEO : आमदार शहाजी बापू पटलांचं मतदारांना भावनिक आवाहन; म्हणाले... | Marathi News

Chhatrapati Sambhajinagar: रेडीको एनव्ही कंपनीमधील बॉयलरचा स्फोट; 3 कामगारांचा मृत्यू

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा, सीसीसीटीव्हीद्वारे आरोपींचा शोध सुरू

IND vs AUS: लय अवघड हाय गड्या.. दोनदा बॅटिंगला येऊनही विराटला अवघ्या इतक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT