Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंहंसाठी संभाजी ब्रिगेडने आणला पाच हजारांचा चष्मा, जाणून घ्या कारण

महापालिका आयुक्त शिखर सिंह यांनी योग्य ती कायदेशीर कारवाई न केल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला.
Shekhar Sinh, Pimpri Chinchwad, Pimpri Chinchwad Muncipal Corportaion Commissioner
Shekhar Sinh, Pimpri Chinchwad, Pimpri Chinchwad Muncipal Corportaion CommissionerSaam Tv
Published On

Pimpri Chinchwad News :

वाकड येथील आरक्षित जागेचा टी डी आर घोटाळ्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर महापालिका आयुक्त शेखर सिंह (shekhar singh) यांनी कारवाई करावी या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडने आज (बुधवार) चष्मा भेट दो आंदोलन केले. आमच्या आंदाेलनाची वेळीच दखल घ्यावी अन्यथा आंदाेलनाची तीव्र वाढवणार असा इशारा संभाजी ब्रिगेडचे शहाध्यक्ष सतीश काळेंनी दिला. (Maharashtra News)

पिंपरी चिंचवड महापालिका टी डी आर घोटाळ्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड मागील सात - आठ दिवसापासून महापालिकेच्या दारावर साखळी उपोषण करत आहेत. मात्र महापालिका आयुक्त शिखर सिंह यांना आमचं आंदोलन आणि मागण्या दिसत नसल्याने कदाचित त्यांना दृष्टीदोष झाला असावा असा समज संभाजी ब्रिगेडचा झाला आहे.

Shekhar Sinh, Pimpri Chinchwad, Pimpri Chinchwad Muncipal Corportaion Commissioner
Maratha Reservation : जरांगेंच्या मनात आजही शंका आहे, सरकारची जबाबदारी वाढली : शशिकांत शिंदे, जरांगेंनी आंदाेलन स्थगित करावे : नरेंद्र पाटील

त्यामुळे संभाजी ब्रिगेडने जवळपास पाच हजार रुपये किमत असलेला चष्मा महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना भेट देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आपल्या कार्यालया बाहेर संभाजी ब्रिगेड आंदोलन करणार याची जाणीव झाल्याने आंदोलनाच्या वेळी शेखर सिंह यांनी कार्यालयात उपस्थित राहण टाळलं आहे.

Shekhar Sinh, Pimpri Chinchwad, Pimpri Chinchwad Muncipal Corportaion Commissioner
Success Story : काेराेना काळात नाेकरी गेली, पठ्ठ्याने हार न मानता द्राक्षच्या पंढरीत फुलवली सफरचंदाची बाग

भविष्यात आंदोलन तीव्र करणार

पिंपरी चिंचवड महापालिकेत वाकड येथील आरक्षित भूखंडाचा जवळपास पंधराशे कोटी रुपयाचा टीडीआर घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याला राज्य सरकारने देखील स्थगिती दिली आहे. मात्र ज्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या आणि बांधकाम व्यवसायिकाच्या आर्थिक फायद्यासाठी फायद्यासाठी बिल्डरच्या सोबत संगनमत करून टीडीआर घोटाळा केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यांच्यावर महापालिका आयुक्त शिखर सिंह यांनी योग्य ती कायदेशीर कारवाई न केल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी दिला.

Edited By : Siddharth Latkar

Shekhar Sinh, Pimpri Chinchwad, Pimpri Chinchwad Muncipal Corportaion Commissioner
Sharad Pawar : काही गोष्टींबाबत सरकारने समंजस भूमिका घ्यायची असते, असं का म्हणाले शरद पवार? (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com