Sharad Pawar : काही गोष्टींबाबत सरकारने समंजस भूमिका घ्यायची असते, असं का म्हणाले शरद पवार? (पाहा व्हिडिओ)

Onion Export Ban : ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, मी शेती मंत्री असताना कधीच कांदा उत्पादकांवर कर बसवला नाही. त्यांचा माल जगात काेठेही विकण्यासाठी थांबवला गेला नाही.
sharad pawar demands roll back of ban on onion export
sharad pawar demands roll back of ban on onion export Saam TV
Published On

- रणजीत माजगावकर

Sharad Pawar News :

कांदा निर्यात बंदी ही सरकारची भूमिका चुकीची आहे. मी कांदा उत्पादकांसोबत आहे. सध्याचे सरकार दर 15 दिवसाला आपली भूमिका बदलत आहे अशी खंत व्यक्त करत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कांदा निर्यात बंदीच्या निर्णयावर केंद्र सरकारवर टीका केली. काही गाेष्टींबाबत सरकराने समंजस भूमिका घ्यायची असते असा सल्ला देखील पवार यांनी सरकारला दिला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ज्येष्ठ नेते शरद पवार हे काेल्हापूर जिल्हा दाै-यावर आलेत. माध्यमांशी बाेलताना शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या कारभाराविषयी टीका केली. ते म्हणाले मी शेती मंत्री असताना कधीच कांदा उत्पादकांवर कर बसवला नाही. त्यांचा माल जगात काेठेही विकण्यासाठी थांबवला गेला नाही.

sharad pawar demands roll back of ban on onion export
Cotton Price Issue : शेतक-यांचे नव्हे व्यापाऱ्यांचे सरकार : आमदार के.सी.पाडवी

कवड्याच्या माळा घाला...

त्यावेळी माझ्यासमाेर भाजपचे लाेक कांद्याच्या माळा घालून आले. त्यावेळी मी त्यांना सांगितले कांद्याची किंवा कवड्याची माळ घालून या. कांद्याला कधी नाही ताे भाव मिळत आहे. तुम्ही दंगा करण्याचे कारण नाही. शेतक-याला दाेन पैसे मिळत आहेत. त्यामुळे त्याच्यावर कर लादणार नाही हे मी सभागृहात स्पष्ट केले.(Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

sharad pawar demands roll back of ban on onion export
वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेचा राज्य सरकारला 5 मार्चपर्यंतचा अल्टीमेटम

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com