Why Kamgar Din is Celebrated Saam Tv
महाराष्ट्र

Importance of Workers Day: १ मे ला 'कामगार दिन' का साजरा करतात? जाणून घ्या

1st May Celebrated As Kamgar Din: १ मे हा दिन जगभरात 'कामगार दिन' म्हणून साजरा केला जातो. जगभरातील कामगारांना, मजूरांना हा दिवस समर्पित केला जातो. या दिनाला 'आंतरराष्ट्रीय श्रमिक दिवस' असेही म्हणतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

१ मे हा दिन जगभरात 'कामगार दिन' म्हणून साजरा केला जातो. जगभरातील कामगारांना, मजूरांना हा दिवस समर्पित केला जातो. या दिनाला 'आंतरराष्ट्रीय श्रमिक दिवस' असेही म्हणतात. कामगारांना सन्मान मिळण्यासोबतच त्यांना त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवता यावा. कामगारांना समजात अधिक चांगले स्थान मिळावे, यासाठी 'कामगार दिन' साजरा केला जातो. कोणत्याही देशाचा विकास होताना कामगारांची महत्त्वाची भूमिका असते. प्रत्येक काम हे कामगारांमुळेच पूर्ण होते. त्यामुळेच हा दिन साजरा केला जातो.

१८८९ मध्ये 'कामगार दिन' साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आहे. ज्यावेळी कामगार आपल्या हक्कासाठी एकत्रितपणे रस्त्यावर आला होता तेव्हा कामगार दिन साजरा करण्याची सुरुवात शिकागो आणि अमेरिकेत सुरु झाली.

१८८६ पूर्वी अमेरिकेत कामगार चळवळ सुरु झाली. अमेरिकन कामगार आपल्या हक्कासाठी संपावर गेले, रस्त्यावर आले. कामाचे तास जास्त असल्याने त्यांनी ही चळवळ सुरु केली होती. त्या काळात कामगार १५ तास काम करायचे. आंदोलनादरम्यान पोलिसांनी कामगारांवर गोळीबार केला. यामुळे काही कामगारांनी जीव गमावा लागला. अनेक कामगार जखमी झाले.

या घटनेनंतर १८८९ मध्ये आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत कामगारांना दिवसाला ८ तास काम करावे लागेल, असा निर्णय घेण्यात आला. परिषदेनंतर १ मे रोजी कामगार दिन साजरा करण्याचे ठरवले. दरवर्षी १ मे रोजी कामगारांना सुट्टी देण्याचाही निर्णय घेण्यात आला. नंतर अनेक देशात कामगारांना ८ तास काम करण्याचा निर्णय लागू केला.

अमेरिकेसह इतर अनेक देशात १ मे १८८९ पासून कामगार दिन साजरा करण्यात आला. परंतु भारतात जवळपास ३४ वर्ष म्हणजे १ मे १९२३ पासून कामगार दिन साजरा करण्यात आला. बारतीय कामगार त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवत होते. तयाच चळवळीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विलेपार्ले येथील जैन मंदिरावर के-पूर्व प्रभाग कार्यालयाने केलेली तोडक कारवाई योग्यच

Parbhani : शेती मशागत करताना दुर्दैवी घटना; कोळपणी करताना विद्युत तारेला स्पर्श, शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Dark Circle Removal Tips: बर्फ लावल्याने खरचं डार्क सर्कल गायब होतात का? जाणून घ्या सत्य

नवी मुंबईत वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश, ग्राहकांकडून प्रति तास ४ हजार घ्यायचे; पोलिसांनी 'असा' रचला सापळा

Ratnagiri To Kolhapur Travel: रत्नागिरीहून कोल्हापूरला कसे जाल? वाचा सर्वोत्तम वाहतूक पर्याय आणि ट्रॅव्हल टिप्स

SCROLL FOR NEXT