Sangli Accident News, Nipani, Pandharpur, Ratnagiri Nagpur Highway saam tv
महाराष्ट्र

Sangli Accident News : निपाणीहून पंढरपूरला निघालेली गाडी दुभाजकास धडकली, 13 जखमी

अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना वाहनाच्या बाहेर काढले.

विजय पाटील

Sangli Accident News : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात आज (शनिवार) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव टोल नाक्यावर (borgaon toll plaza) झालेल्या अपघातात 13 जण जखमी झाले आहेत. पाेलिस घटनेची चाैकशी करीत आहेत.(Maharashtra News)

हा अपघात रत्नागिरी- नागपूर महामार्गावरील (ratnagiri nagpur highway) सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव टोल नाक्यावर आज पहाटे झाला. या अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. वाहन चालकास डुलकी लागल्याने वाहन टोल नाक्याच्या दुभाचकला जाऊन धडकले.

त्यानंतर वाहन पलटी झाले. हा अपघात झाल्याचे पाहताच काही नागरिक वाहनाच्या दिशेने धावले. त्यांनी वाहनातील प्रवाशांना वाहनाच्या बाहेर काढण्यास प्रारंभ केला. यावेळी वाहनातील काही जणांना मार लागला हाेता. या अपघातात सुमारे 13 जण जखमी झाले आहेत. हे सर्व निपाणीहुन पंढरपूरला निघाले हाेते. सर्व जखमांना मिरजे आणि सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीतील भाजपच्या 6 बंडखोर पदाधिकाऱ्यांची भाजपमधून हकालपट्टी

Avika Gor : 'बालिका वधू' फेम अविका गौर प्रेग्नेंट? 'त्या' वक्तव्याने चर्चेला उधाण, पाहा VIDEO

PIB Fact Check: SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! Aadhaar अपडेट करा अन्यथा खातं होणार बंद; वाचा व्हायरल मेसेजमागचं सत्य

Maharashtra Tourism : जंगल ट्रेकिंगचा रोमांचक अनुभव घ्या, थंडीत 'या' ठिकाणाची सफर करा

Face Yoga Exercise: सकाळी उठल्यावर करा हे 5 फेस योगा प्रकार, काचेसारखा चमकत राहील चेहरा

SCROLL FOR NEXT