Satara Collector Transfer: सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीमागे राजकारण ? साेमवारी महामाेर्चा

Collector Ruchesh Jaivanshi Transfer: जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जनतेचे हित जाेपासल्याने बदली झाल्याची भावना सातारा-यात उमटू लागली आहे.
satara , ruchesh jaivanshi
satara , ruchesh jaivanshisaam tv
Published On

Satara News : साता-याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी (ruchesh jaivanshi) यांच्या बदलीमागे राजकारण असल्याचा आराेप बळीराजा शेतकरी संघटनेने (baliraja shetkari sanghatana) केला आहे. जयवंशी यांची बदली रद्द न झाल्यास येत्या सोमवारी (ता. 12) शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडतील असा इशारा बळीराजा संघटनेने दिला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी यांची बदली रद्द व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुशांत माेरे (social activitist sushant more) यांनी देखील सरकारला मागणी केली आहे. (Maharashtra News)

satara , ruchesh jaivanshi
Kolhapur Internet Service Update : काेल्हापूरातील इंटरनेट सेवा काेलमडली, युवा वर्ग भडकला; Work From Home वाल्यांची झाली माेठी

बळीराजा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील म्हणाले साताराचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची राज्य सरकारने त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापुर्वीच बदली केली. या जिल्ह्याला एका चांगल्या अधिकाऱ्यांपासून पोरके केल्याचेही पाटील यांनी नमूद केले. अचानक बदली होण्यापाठीमागे राजकारण झाले असण्याची शक्यता पाटील यांनी वर्तवली आहे.

satara , ruchesh jaivanshi
Nagar Aurangzeb Status: समाज माध्यमातून औरंगजेबचा प्रचार, हिंदु संघटना आक्रमक; युवकांवर गुन्हा दाखल

बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांमध्ये जे- जे शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्यापुढे मांडले ते त्यांनी प्रामाणिकपणे सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला असेही पाटील यांनी नमूद केले. ते म्हणाले जिल्ह्यातील शेतरस्ते, पाणंद रस्त्यांचा प्रश्न त्यांनी मोठ्या प्रमाणात सोडवलेला आहे. साखर कारखाने सुरू होण्यापूर्वी मागील हंगामात (satara) जिल्हाधिकारी यांनी साखर कारखाना व शेतकरी संघटना प्रतिनिधी यांची बैठक घेऊन ऊसदराबाबत योग्य तोडगा काढून २४०० रुपयावरून तीन हजार रुपये प्रतिटन दर देण्याचे काम त्यांच्या पुढाकारामुळे झाले.

satara , ruchesh jaivanshi
Mahabaleshwar News : पर्यटकांनाे ! शुक्रवार, शनिवार, रविवार महाबळेश्वर पाचगणीला जाणार आहात ? वाचा वाहतुकीतील महत्त्वपूर्ण बदल

अशा चांगल्या अधिकाऱ्याची अचानक बदली होणे याच्या पाठीमागे राजकारण झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे एका कार्यक्षम अधिकाऱ्याला सातारा जिल्हा मुकणार आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी व संघटनांनी या बदलीच्या विरोधात तीव्र आवाज उठवून वेळप्रसंगी साताऱ्यामध्ये आंदोलन करण्याची गरज असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

satara , ruchesh jaivanshi
Reliance Jewels दराेड्याप्रकरणी सहा जण पाेलिसांच्या ताब्यात

या बदलीचा बळीराजा शेतकरी संघटना तीव्र निषेध करत असून, राज्य सरकारने जिल्हाधिकारी जयवंशी यांची बदली तत्काळ रद्द करावी. अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बरोबर घेऊन १२ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करेल, याची प्रशासनाने व सरकारने नोंद घ्यावी असा इशार पाटील यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com