Nagar Aurangzeb Status: समाज माध्यमातून औरंगजेबचा प्रचार, हिंदु संघटना आक्रमक; युवकांवर गुन्हा दाखल

Nagar Aurangzeb Photo Status: पाेलिस समाज माध्यमांवरील चुकीच्या गाेष्टींवर नजर ठेवू लागले आहेत.
Nagar Crime News
Nagar Crime NewsSaam tv
Published On

- सुशिल थाेरात

Nagar News : औरंगजेबचे स्टेटस सोशल मीडियावर (social media) ठेवल्यामुळे नगर (nagar crime news) जिल्ह्यातील बहुतांश गावातील वातावरण तणावपूर्ण बनले हाेते. हिंदुत्त्ववादी संघटनांनी (hindu organisations) संशयितांना अटक करा या मागणीसाठी विविध तालुक्यांमधील पाेलिस ठाण्यात धाव घेतली. तर काही ठिकाणी गाव बंद ठेवण्यात आले. (Maharashtra News)

Nagar Crime News
Kolhapur Internet Service Update : काेल्हापूरातील इंटरनेट सेवा काेलमडली, युवा वर्ग भडकला; Work From Home वाल्यांची झाली माेठी

मिरजगाव येथे काही लोकांनी औरंगजेबचे स्टेटस (Aurangzeb Photo Status) समाज माध्यमांत (social media) ठेवल्याने गुरुवारी मिरजगाव (mirajgaon) मधील सकल हिंदू समाजाच्या वतीने मिरजगाव बंदचे आवाहन करण्यात आले हाेते. त्यास गावक-यांनी प्रतिसाद दिला. गुरुवारी संपुर्ण गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.

Nagar Crime News
MP Ramdas Athawale News : हिंसाचारामागे पाकिस्तानचा हात : रामदास आठवले (पाहा व्हिडिओ)

दरम्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडे या गावातील काही तरुणांनी औरंगजेबचा डीपी ठेवल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच प्रमाणे शेवगाव मध्ये सुद्धा औरंगजेबचा फोटो स्टेटसला ठेवल्यामुळे युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मोसीन अजमोद्दीन शेख, असीफ अजमोद्दीन शेख, शाहीद नईमोद्दीन पठाण असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे. याबराेबरच आणखी एक संशयित अल्पवयीन आहे. त्यांचे मोबाईलचे व्हॉटसअप स्टेटसवर, "औरंगजेब आलमगीर सरकार" असे नाव असलेला औरंगजेबाचा फोटो स्टेटस वर ठेवला होता अशी माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com