Kolhapur News : कोल्हापूर पूर्वपदावर, 44 जणांचा जामीन मंजूर; पाेलिसांच्या कार्यक्षमतेवर असदुद्दीन ओवेसींना शंका

काेल्हापूरातील इंटरनेट सेवा आज सुरळीत सुरु झाल्याने आर्थिक व्यवहारातील अडचणी दूर झाल्या आहेत.
Kolhapur, Asaduddin Owaisi, mp dhananjay mahadik
Kolhapur, Asaduddin Owaisi, mp dhananjay mahadiksaam tv
Published On

- विश्वभूषण लिमये

Kolhapur News : कोल्हापुरची परिस्थिती सामान्य झालेली आहे. सर्व व्यवहार सुरळीत झालेले आहेत. ज्या हिंदुत्ववादी संघटनेच्या (Hindu ideological organization) आणि ज्या कार्यकर्त्यांना अटक झाली होती त्यातील 44 लोकांचा जामीन झालेला आहे. अन्य लोकांचा जमीन देखील होईल असे खासदार धनंजय महाडीक यांनी साेलापूरात माध्यमांशी बाेलताना नमूद केले. दरम्यान एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट करुन पाेलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. (Maharashtra News)

Kolhapur, Asaduddin Owaisi, mp dhananjay mahadik
Pandharpur News : भाविकांनाे ! आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाई मंदिरात 'ही' दर्शन सेवा राहणार बंद

खासदार महाडीक म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनी औरंगजेब (aurangzeb) आणि टिपू सुलतान (tipu sultan) यांचे समाज माध्यमात (social media) स्टेटस ठेवून हिंदू समाज आणि हिंदू युवकांना भडकवण्याचा प्रयत्न केला गेला. म्हणून काेल्हापुर बंदची हाक पुकारली गेली. हजाराेंच्या संख्येने युवक रस्त्यावर उतरले आणि त्यातून काही गैरप्रकार घडले.

ते थोपवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केलेला आहे आणि आत्ता जरी सर्व परिस्थितीत पूर्वपदावर असली तरी आमची एवढीच मागणी आहे. जे कोणी समाजकंटक आहेत त्यांच्यावर ठाेस कारवाई व्हावी असेही महाडीक यांनी नमूद केले.

Kolhapur, Asaduddin Owaisi, mp dhananjay mahadik
Satara Collector Transfer: सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीमागे राजकारण ? साेमवारी महामाेर्चा

खासदार धनंजय महाडीक म्हणाले आपल्या सर्वांचा एकच देव आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे कोणी उदातीकरण करत असेल त्याला माफी करता कामा नये. त्यांच्या पाठीमागे कोण आहे असे उद्योग कोण करतात त्याचा तपास झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे.

Kolhapur, Asaduddin Owaisi, mp dhananjay mahadik
Beed Accident News : चनई परिसरात कार झाडावर आदळली, अंबाजोगाईतील दाेन डाॅक्टर ठार

दरम्यान एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (AIMIM Chief Asaduddin Owaisi) यांनी काेल्हापुरातील घटनेबाबत ट्विट करुन पाेलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

ते लिहितात कोल्हापुरात बजरंग दल शाखेने पुकारलेल्या कोल्हापूर बंद दरम्यान बुधवारी शिवाजी चौकात हिंसाचार झाला. धक्कादायक म्हणजे पोलिसांनी दाखल केलेल्या 350 हून अधिक अज्ञात लोकांमध्ये हिंदू विचारधारा संघटनेच्या एकाही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी याचा समावेश नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com