उटावली आदर्श विद्यालयाजवळ ११ वर्षीय शाळकरी मुलावर बिबट्याचा हल्ला झाला.
पाठीवरील दफ्तरामुळे मयंकचा जीव वाचला; हातावर खोल जखमा झाल्या.
मुलांनी धाडस दाखवून बिबट्याला पळवले, नागरिकांनी मदत केली.
वनविभागाकडे शाळा परिसर व जंगलातील सुरक्षा वाढवण्याची मागणी
पालघर: विक्रमगड तालुक्यातील उटावली आदर्श विद्यालयात शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थ्यावर बिबट्याचा भीषण हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.तर विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या तात्काळ धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली असून परिसरात या मुलांच्या धैर्याचे कौतुक होत आहे.पीडित विद्यार्थी मयंक विष्णु कुवरा (वय ११, इयत्ता ५वी) हा संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर माळा पाडवीपाडा येथे परतत होता.
शाळेतून घर ४ किमी अंतरावर असल्याने तो नेहमीप्रमाणे जंगलरस्त्याने चालत जात असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घातली.हल्ल्यात बिबट्याचे वार थेट मयंकच्या दफ्तरावर झाल्याने त्याचा जीव थोडक्यात वाचला.मात्र नखांमुळे मयंकच्या हातावर खोल जखमा झाल्या. अचानक झालेल्या हल्ल्यानंतरही मयंकने आरडाओरड करत प्रतिकार केला, तर त्याच्यासोबत असलेल्या मुलाने दगडफेक केली. त्यानंतर जवळील नागरिक घटना स्थळी धावत येताच बिबट्या जंगलात पसार झाला.
या परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्या फिरत असल्याची चर्चा होती. गावकऱ्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून सावधगिरीचा इशारा दिला होता. तरीही शाळकरी मुले जंगलातूनच प्रवास करत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमी मयंकवर विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून खोल जखमेवर टाके घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
घटनेनंतर नागरिकांनी वनविभागाने तातडीने पावले उचलावीत, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा परिसर आणि जंगल पट्ट्यात गस्त वाढवावी तसेच मुलांच्या ये-जा मार्गावर सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करावी, अशी मागणी केली आहे.या प्रसंगी बिबट्याला पळवून लावणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कठोर हिमतीचे आणि पराक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.