ऐन निवडणुकीत अजित दादांच्या गटात धुसफूस, आमदाराची 'मुंडेंना पाठवू नकाच', अशी मागणी; कारण काय?

Prakash Solanke on Dhananjay Munde: बीडमधील माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी स्टार प्रचारक म्हणून, आमदार धनंजय मुंडे यांना माझ्या मतदारसंघात पाठवू नका, असा थेट पक्षाला निरोप पाठवला आहे.
Prakash Solanke on Dhananjay Munde
Prakash Solanke on Dhananjay MundeSaam
Published On
Summary
  • 'परळीमध्ये मुंडे बहीण भावाची युती होते, मग जिल्ह्यात का होत नाही?'

  • 'युती होऊ नये म्हणून काहींनी प्रयत्न केले'

  • 'मात्र युती होण्यासाठी कोणीही पुढाकार घेतला नाही हे दुर्दैव' - प्रकाश सोळंके

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. महायुती तसेच महाआघाडीतील नेत्यांनी कंबर कसली आहे. प्रचारासाठी नेते मंडळी स्टार प्रचारकसोबत मैदानात उतरले आहेत. अशातच बीड जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांमधील वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्तेंमधील वाद तर होतेच, मात्र आता आमदारांमधील वाद देखील जनतेसमोर येऊ लागले आहेत. बीडमधील माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी 'स्टार प्रचारक म्हणून आमदार धनंजय मुंडे यांना माझ्या मतदारसंघात पाठवू नका', असा थेट निरोप पक्षाला पाठवलाय.

'स्टार प्रचारक म्हणून धनंजय मुंडे यांना माझ्य मतदारसंघात पाठवू नका. अशी माहिती मी पक्षाला दिलीय', असे स्पष्ट विधान आमदार प्रकाश सोळंके यांनी केले आहे. 'धनंजय मुंडे इथे येऊन नेमका कोणता स्टारपणा दाखवणार आहेत? स्टार प्रचारक म्हणून त्यांचे काम परळीतच राहावे. ते माजलगावात आले तर, वेगळ्याच प्रकारचा विपरकीत परिणाम घडू शकतो', असं देखील सोळंके म्हणाले.

Prakash Solanke on Dhananjay Munde
'माझ्याकडे सुप्तशक्ती..' भोंदूबाबानं विवाहितेला पळवून नेलं, दरबारात सापडली कंडोमची पाकिटं अन्..

'परळीत मुंडे बहीण भावांची युती होते. मग जिल्ह्यात का होत नाही? युती होऊ नये म्हणून काहींनी प्रयत्न केले. युती करण्यासाठी कोणीही पुढाकार घेतला नाही, हे दुर्दैव आहे', असं देखील सोळंके म्हणाले. 'स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती करणे अवघड असते. बीड जिल्ह्यात फक्त परळीत युती होते. इतर ठिकाणी युतीसाठी कोणीही प्रयत्न करत नाही, हीच खंत आहे,' असेही सोळंके म्हणाले.

Prakash Solanke on Dhananjay Munde
दोघेही रंगाने सावळे, मग मुल गोरं कसं झालं? नवऱ्याकडून चारित्र्यावर संशय, बायकोला झोपेतच संपवलं

'या निवडणुकीत आम्ही आमची ताकद दाखवून देऊ. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी युतीसाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. उलट युती होऊ नये यासाठीच जास्त प्रयत्न झाले, असेच मला वाटते,' असं प्रकाश सोळंके म्हणाले. 'परळीत युती जमते आणि इतर ठिकाणी जमत नाही, हे मुंडे बहीण-भावांना विचारले पाहिजे. स्टार प्रचारक म्हणून धनंजय मुंडे यांना माझ्या भागात येण्याचे कारण नाही. त्यांनी परळीतच प्रचार करावा. ते आमच्या भागात आले तर विपरित परिणाम होईल. त्यामुळे धनंजय मुंडेंना माझ्याकडे न पाठविण्याची विनंती मी पक्षाला केली आहे', असं प्रकाश सोळंके म्हणाले.

Prakash Solanke on Dhananjay Munde
तिसऱ्या मजल्यावर गेली अन् ८वीत शिकणाऱ्या आरोहीनं उडी मारली; रक्ताच्या थारोळ्यात लेकीला पाहून वडिलांना धक्का | Jalna

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com