Nashik Ring Road : नाशिकमधील वाहतूककोंडीची कटकट संपणार, ६६ किमीचा रिंग रोड, ८,००० कोटींचा प्रोजेक्ट कसा असेल?

नाशिकमधील वाढत्या वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी ६६ किमी लांबीचा रिंग रोड प्रकल्प मंजूर झाला आहे. ८ हजार कोटींच्या या प्रकल्पामुळे कुंभमेळ्यापूर्वी वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.
Nashik Ring Road
Nashik Ring RoadSaam Tv
Published On
Summary
  • नाशिकमध्ये वाढत्या वाहतूककोंडीवर उपाय म्हणून ६६.१५ किमी रिंग रोड प्रकल्पाला मान्यता.

  • प्रकल्पाची एकूण किंमत अंदाजे ८ हजार कोटी रुपये; काम २०२७ कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण होणार.

  • जमीन संपादनासाठी ३,६५९ कोटी तर बांधकामासाठी ४,२६२ कोटींचा अंदाज.

  • नाशिककरांच्या दैनंदिन वाहतुकीसह कुंभमेळ्यातील भाविकांसाठी मोठा दिलासा मिळणार.

Nashik Ring Road Ahead Of 2027 Kumbh Mela : नाशिक शहराचा जसा विकास झाला, त्याचप्रमाणे शहरात वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील मुंबई नाका, द्वारका, संभाजीनगर रोड, पुणे रोड या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. १० मिनिटांच्या प्रवासासाठी अर्धा तास ते एक तास वेळ लागतो. त्यामुळे नाशिककर वैतागले आहेत. त्यातच आता नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यामुळे वाहतूककोंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. या वाढत्या वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून मोठं पाऊल उचलण्यात आले आहे.

सिंहस्थ कुंभमेळा आणि वाढत्या वाहतूककोंडी कमी करण्यासाठी नाशिकमध्ये ६६ किमीचा रिंग बांधला जाणार आहे, त्याला मंत्रिमंडळाची मंजूरी मिळाली आहे. त्यासाठी आट हजार कोटींचा खर्च येईल. कुंभमेळ्यात भाविकांचे सोय व्हायला हवी. त्यासाठी रिंग रोड तयार करण्यात येणार आहे. या रिंग रोडचा फायदा भविष्यातल्या नाशिकसाठी होणार आहे. २०२७ च्या आधी नाशिकचा हा रिंग रोड तयार करण्याचा मास्टरप्लान सरकारकडून तयार करण्यात आला.

Nashik Ring Road
Mumbai : मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार

नाशिकला तयार होणारा रिंग रोड ६६.१५ किमी लांबीचा असेल. याची अंदाजे किंमत ८ हजार कोटी इतकी असी शकते. या प्रकल्पाला नुकतीच सरकारकडून मान्यता मिळाली आहे. एमएसआरडीसी ऐवजी एमएसआयडीसी मार्फत हा प्रजोक्ट तयार होणार आहे. राज्य पायाभूत सुविधा विषयक मंत्रिमंडळ समितीने भूसंपादन खर्चाला मान्यता दिली आहे. त्यामुळे या रिंग रोड प्रकल्पाचे काम वेगात सुरू होऊ शकते.

Nashik Ring Road
Maharashtra politics : शिंदेंना जागा दाखवली जातेय, ३५ आमदार भाजपात जाणार, महाराष्ट्रात खळबळ उडवणारा दावा

राज्य पायाभूत सुविधा विषयक मंत्रिमंडळ समितीने नाशिक रिंग रोडसाठी ३,६५९.४७ कोटी रुपयांच्या भूसंपादन खर्चाला मान्यता दिली आहे. ४,२६२.६४ कोटी रुपयांच्या अंदाजे बांधकाम खर्चाबाबत केंद्रासोबत चर्चा सुरू आहे. भूसंपादनासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणामार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाशी (MoRTH) चर्चा पूर्ण झाल्यानंतर राज्य आणि केंद्र याबाबत सामंजस्य करार (MoU) होणार आहे.

Nashik Ring Road
Pune Crime : नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध, भावानेच भावाची केली हत्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com