Pune Crime : नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध, भावानेच भावाची केली हत्या

Pune Crime: पुण्यात कात्रज परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयातून चुलत भावानेच अजय गणेश पंडित (वय २२) याची चाकूने वार करून हत्या केली. मृतदेह डोंगराळ भागात फेकण्यात आला होता.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam TV Marathi News
Published On
Summary
  • अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून अजय पंडित याची त्याच्या चुलत भावाने हत्या केली.

  • अजयचा मृतदेह कात्रजमधील डोंगराळ भागात आढळला.

  • चौकशीदरम्यान आरोपी अशोक पंडित याने चाकूने वार करून खून केल्याची कबुली दिली.

  • भारती विद्यापीठ पोलिसांच्या पथकाने कसून तपास करून आरोपीला ताब्यात घेतले.

Pune murder, Katraj crime : पुण्यामध्ये भावानेच भावाची हत्या केल्याच्या घटनेत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून चुलत भावाने भावाचा खून केला. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू केला आहे. अजय गणेश पंडित (वय २२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर या प्रकरणी आरोपी अशोक कैलास पंडित (वय ३५, रा. मोशी, मूळ झारखंड) याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.

नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून अजय गणेश पंडित (वय २२) या तरुणाचा त्याच्याच चुलत भावाने खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोघेही मूळचे झारखंडचे असून,गेली चार वर्षे मजुरीचे काम करतात. अजय हा कात्रजमधील खोपडेनगर परिसरात एका गृहप्रकल्पाच्या आवारात राहत होता. अजय हा १७ नोव्हेंबर रोजी रात्री घरातून भाजी आणण्यासाठी गेला होता.परंतु तो अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार भारती विद्यापीठ पोलिसांकडे प्राप्त झाली. त्यानंतर या प्रकरणी तपासाची सूत्रे हलली अन् आरोपीला बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी आरोपी अशोक याच्या मुसक्या आवळल्या. चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर आधी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पण खाकी दाखवल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला. अशोक याने चुलत भाऊ अजयचा चाकूने वार करून खून केला. गुन्हा लपविण्यासाठी मृतदेह कात्रजमधील गुजर निंबाळकरवाडी भागातील डोंगराळ परिसरात टाकल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी मृतदेह शोधून काढत ताब्यात घेतला. पोस्टमार्टमसाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला आहे. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक आयुक्त राहुल आवारे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे, सहाय्यक निरीक्षक स्नेहल थोरात, पोलिस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com