Mumbai : मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार

Vikhroli Parksite murder of Shiv Sainik : विक्रोळी पार्कसाईटमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिक सुरेंद्र धोंडुराम पाचाडकर यांची किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून लोखंडी रॉडने हत्या करण्यात आली. घाटकोपर सीजीएस कॉलनी येथे ही घटना घडली. आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
Vikhroli Parksite News
Vikhroli Parksite NewsSaam TV Marathi News
Published On
Summary
  • विक्रोळी पार्कसाईट येथील शिवसैनिक सुरेंद्र पाचाडकर यांची लोखंडी रॉडने हत्या झाली.

  • किरकोळ धक्का लागल्यावरून झालेल्या वादातून भांडण वाढून हाणामारी झाली.

  • सुरेंद्र यांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी ८० सीसीटीव्ही तपास करून आरोपी अमन वर्मा याला अटक केली.

  • या घटनेमुळे परिसरात संताप आणि शोकाची भावना पसरली आहे.

Mumbai Vikhroli Parksite Murder News : मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून पदाधिकाऱ्याची हत्या (Murder news) करण्यात आली. सुरेंद्र धोंडुराम पाचाडकर असे हत्या झालेल्या शिवसैनिकाचे नाव आहे. विक्रोळी पार्कसाईट (Vikhroli Parkiste) विभागात कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे. गुरुवार रात्री घाटकोपरच्या सीजीएस कॉलनी पाचाडकर यांची लोखंडी रॉडने हत्या झाली. या धक्कादायक घटनेने पार्कसाईट परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

Vikhroli Parksite News
Maharashtra politics : शिंदेंना जागा दाखवली जातेय, ३५ आमदार भाजपात जाणार, महाराष्ट्रात खळबळ उडवणारा दावा

फक्त धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून पाचाडकर यांची हत्या करण्यात आली. घाटकोपरच्या सीजीएस कॉलनी परिसरात गुरुवार घडली आहे. या घटनेत मयत इसमाचे नाव सुरेंद्र धोंडुराम पाचाडकर असे असून ते विक्रोळी पार्कसाईट परिसरात राहायचे. तर या प्रकरणी अमन श्रीराम वर्मा या १९ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अवघ्या पाच तासात अटक केली आहे. नेहमीप्रमाणे सुरेंद्र हे घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात फेरफटका मारण्यास आले होते. घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या शेजारी असलेली सीजीएस कॉलनीमधून चालत जात असताना त्यांना आरोपी अमनचा धक्का लागला. यावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली अन् त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

Vikhroli Parksite News
का रे दुरावा! फडणवीस-शिंदेंनी एकमेकांशी बोलणं टाळलं, राजकीय वर्तुळात चर्चांना जोर, पाहा व्हिडिओ

अमन याने जवळ पडलेल्या लोखंडी रॉड उचलून सुरेंद्र यांच्या डोक्यात घातला. यामुळे सुरेंद्र यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते खाली कोसळले. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना देताच घाटकोपर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या सुरेंद्र यांना जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरु केला. सुमारे ८० सीसीटीव्हीचा तपास करून आणि कसून तपास केला. पोलिसांनी अवघ्या पाच तासात रमाबाई कॉलनी येथून आरोपीला अटक केली.

Vikhroli Parksite News
Thane News : भाजपच्या नेत्याने शिंदेंच्या शिवसेना नेत्याच्या कानशिलात लगावली, ठाण्याचे राजकारण तापलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com