11th Admission Saam Tv
महाराष्ट्र

11th Admission: १०वीत नापास झालात तरीही मिळेल अकरावीत अ‍ॅडमिशन, सोप्या शब्दात समजून घ्या

Can 10th Fail Students Get Admission In 11th Std: दहावी नापास झालेले विद्यार्थीदेखील अकरावीत प्रवेश घेऊ शकणार आहेत. परंतु बारावीला प्रवेश घेण्यापूर्वी त्यांना दहावी पास करावी लागणार आहे.

Siddhi Hande

काल दहावीचा निकाल जाहीर झाला. राज्याचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. दहावीच्या परीक्षेत मुलांनी घवघवीत यश मिळवले आहेत. त्यानंतर आता अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे. दरम्यान, काही विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत अपयश आलं आहे. त्यामुळे पुढे काय करायचा असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. परंतु तुम्ही खचून जावू नका. तुम्ही नापास झालात तरीही पुढे तुमच्याकडे करिअर ऑप्शन आहेत. याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

दहावीतील बोर्डाच्या परीक्षेत नापास झालेल्या मुलांना खूप टेन्शन आले असेल. परंतु तुम्ही अकरावीत प्रवेश घेऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या श्रेणीनुसार आणि गुणसुधार योजनेनुसार अकरावीत प्रवेश घेता येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाने श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजना सुरु केली आहे.

या परीक्षेत सर्व विषयात पास झालेले विद्यार्थी त्यानंतरच्या तीन परीक्षेसाठी पात्र होऊ शकतो. फेब्रेवारी मार्चमध्ये नापास झालेला विद्यार्थी जुन जुलै २०२५ परीक्षा, फेब्रुवारी मार्च२०२६ आणि जून जुलै २०२६ यापैकी कोणत्याही एका परीक्षेसाठी तो विद्यार्थी बसू शकतो. याबाबत शरद गोसावी यांनी माहिती दिली आहे.

दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्याला अकरावीत प्रवेश (11th Admission)

दहावीसाठी ATKT लागू केली आहे. जर एखादा विद्यार्थी एक किंवा दोन विषयात नापास झाला तरी त्याला अकरावीला प्रवेश मिळणार आहे. याला allowed to keep terms म्हणजेच एटीकेटी म्हणतात.त्यानुसार तुम्ही अकरावीत अॅडमिशन घेऊ शकतात. परंतु बारावीसाठी अॅडमिशन घेण्यापूर्वी तुम्ही दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. दहावी पास केल्यानंतर अकरावी आणि मग नंतर बारावीची परीक्षा तुम्ही देऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी आक्रमक; शरद पवारांच्या नेतृत्वात नाशकात मोर्चा निघणार, VIDEO

Lalbaugcha Raja : ३३ तासांनी लालबागच्या राजाचं अखेर विसर्जन, पाहा शेवटची झलक; VIDEO

Iron Deficiency : जास्त चहा प्यायल्याने शरीरात आयरनची कमतरता होते का?

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनाला २४ तास उशीर, जबाबदार कोण? अध्यक्षांकडून दिलगिरी

Lalbaugcha Raja Visarjan : ‘पुढच्या वर्षी लवकर या’ लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले

SCROLL FOR NEXT