11th Admission: कामाची बातमी! अकरावीच्या प्रवेशासाठी १० कॉलेज निवडता येणार, अ‍ॅडमिशनसाठी लागणार ६ कागदपत्रे, वाचा सविस्तर

11th FYJC Admission Process Documents: अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. अॅडमिशन घेताना तुम्हाला १० कॉलेज निवडता येणार आहेत. यासाठीची संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या.
11th FYJC Admission
11th FYJC AdmissionSaam Tv
Published On

काल दहावीचा निकाल लागला आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थ्यांसाठी अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरु होणार आहे. ही प्रवेशप्रक्रिया कशी असणार, विद्यार्थ्यांना कोणतं कॉलेज निवडता येणार, किती कॉलेज टाकता येणार, असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या मनात निर्माण झाले आहे. याबाबत आज आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत. (11th FYJC Admission)

11th FYJC Admission
11th Admission Process: अकरावीत प्रवेश घ्यायचा कसा, कॉलेज निवडायचे कसे? किचकट प्रक्रिया सोप्या भाषेत

अकरावीच्या अॅडमिशनसाठी १० कॉलेज निवडता येणार (fyjc college selection form)

अकरावीसाठी प्रवेश घेताना तुम्हाला १० कॉलेजची निवड करता येणार आहे. तुम्हाला तुमच्या प्राधान्यानुसार आता कॉलेज टाकावे लागणार आहे. यासाठी फॉर्म लवकरच सुरु होईल. विद्यार्थ्यांनी त्यांच्या पसंतीक्रमानुसार कॉलेज टाकायचे आहे. यानंतर मेरिट लिस्ट लागणार, यामध्ये तुम्ही ज्या कॉलेजसाठी पात्र आहात, कॉलेजच्या कट ऑफनुसार तुमचा नंबर लागणार.

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी माध्यमिक शिक्षण विभागाने https://mahafyjcadmissions.in हे संकेतस्थळ सुरु केले आहे. दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कला, विज्ञान, वाणिज्य शाखेत प्रवेश घ्यायची संधी मिळणार आहे. त्यानुसार तुम्हाला तुमच्या शाखेनुसार कॉलेज निवडायचे आहेत.११ मेपासून ही ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे.

11th FYJC Admission
SSC Exam Result : लातूर पॅटर्नचा डंका कायम; ११३ विद्यार्थ्यांनी मिळविले १०० टक्के, बदलापूर पालिकेच्या सर्व शाळांचा १०० टक्के निकाल

अॅडमिशनसाठी ही कागदपत्रे आवश्यक (11th FYJC Admission Documents)

गुणपत्रिका

शाळा सोडल्याचा दाखला

आधारकार्ड

पासपोर्ट साइज फोटो

जातीचा दाखला

दुर्बल घटकातून अर्ज करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचा दाखला

अकरावी प्रवेशासाठी दोन फॉर्म (11th FYJC Admission 2 Forms Filling)

ऑनलाइन प्रवेशासाठी तुम्हाला दोन फॉर्म भरावे लागणार आहेत. दुसऱ्या फॉर्ममध्ये तुम्हाला कॉलेजची नावे टाकावी लागणार आहे.

खुल्या प्रवर्गासाठी ५५ टक्के तर आरक्षणातून ४५ टक्के प्रवेश मिळणार आहे.

प्रवेशासाठी तीन मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे. त्यानंतर गरजेनुसार स्पेशल मेरिट लिस्ट जारी केली जाणार आहे.

11th FYJC Admission
11th Admission Process : विद्यार्थी-पालकांची प्रतिक्षा संपली! दहावीचा निकाल अखेर जाहीर, ११वीची प्रवेश प्रक्रिया कधीपासून?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com