11th Admission Dates and Process
11th Admission Dates and Process Saam Tv News

11th Admission Process : विद्यार्थी-पालकांची प्रतिक्षा संपली! दहावीचा निकाल अखेर जाहीर, ११वीची प्रवेश प्रक्रिया कधीपासून?

what next for 11th admissions important dates and process : ११वीची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून म्हणजेच १९ मे २०२५ पासून सुरु होणार आहे. त्यामुळे सगळ्या पालकांनी आपापल्या पाल्यांचे कागदपत्र जोडायला सुरुवात करायची आहे.
Published on

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. त्यानंतर दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीनं निकालाची गुणपत्रिका विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन पद्धतीनं निकाल पाहता येतील, असं मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केलेलं. तर आता ११वीच्या प्रवेश प्रक्रियेची लगबग सुरु होईल. तर सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे, ११वीची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून म्हणजेच १९ मे २०२५ पासून सुरु होणार आहे. त्यामुळे सगळ्या पालकांनी आपापल्या पाल्यांचे कागदपत्र जोडायला सुरुवात करायची आहे.

यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. यंदाही कोकण विभाग अव्वल असून यंदा दहावीच्या निकालात नागपूर विभाग तळाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली असून उत्तीर्ण झालेल्यी मुलींची टक्केवारी ९६.१४ अशी आहे, तर मुलांची टक्केवारी ९२.२१ अशी आहे.

11th Admission Dates and Process
CBSE Result 2025 : बारावीचा निकाल जाहीर, cbseresults.nic.in वर पाहा रिझल्ट

एकूण ९ विभाग निहाय निकाल

पुणे - ९४.८१ टक्के

नागपूर - ९०.७८ टक्के

संभाजीनगर - ९२.८२ टक्के

मुंबई - ९५.८४ टक्के

कोल्हापूर - ९६.७८ टक्के

अमरावती - ९२.९५ टक्के

नाशिक - ९३.०४

लातूर - ९२.७७

कोकण - ९९.८२

निकालाची वैशिष्ट्ये

- एकूण ६३ विषय त्यापैकी २४ विषयांचा निकाल १०० टक्के

- २३ हजार ४८९ शाळांपैकी ७ हजार ९२४ शाळांचा निकाल १०० टक्के

- ⁠१०० टक्के निकाल २०० विद्यार्थी

11th Admission Dates and Process
10th SSC Result : दहावीचा निकाल घसरला, विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, निकालाची ठळक वैशिष्ट्ये; वाचा एका क्लिकवर

१०० टक्के मिळालेले विद्यार्थी २११

पुणे -१३

नागपूर-३

संभाजीनगर-४०

मुंबई-८

कोल्हापूर-१२

अमरावती-११

नाशिक-२

लातूर-११३

कोकण-९

राज्यातील २८५ विद्यार्थी काठावर पास

पुणे -५९

नागपूर-६३

संभाजीनगर-२६

मुंबई-६७

कोल्हापूर-१३

अमरावती-२८

नाशिक-९

लातूर-१८

कोकण-०

11th Admission Dates and Process
10th SSC Result: परंपरा राखली! यंदाही दहावीच्या निकालात मुलींची बाजी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com