10th SSC Result : दहावीचा निकाल घसरला, विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, निकालाची ठळक वैशिष्ट्ये; वाचा एका क्लिकवर

Maharashtra Board 10th SSC Result 2025 : यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. यंदाही कोकण विभाग अव्वल असून यंदा दहावीच्या निकालात नागपूर विभाग तळाला आहे.
ssc result maharashtra board class 10 result 2025
ssc result maharashtra board class 10 result 2025Saam Tv News
Published On

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. त्यानंतर दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीनं निकालाची गुणपत्रिका विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन पद्धतीनं निकाल पाहता येतील, असं मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केलेलं.

यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. यंदाही कोकण विभाग अव्वल असून यंदा दहावीच्या निकालात नागपूर विभाग तळाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली असून उत्तीर्ण झालेल्यी मुलींची टक्केवारी ९६.१४ अशी आहे, तर मुलांची टक्केवारी ९२.२१ अशी आहे.

निकालाची ठळक वैशिष्ट्ये

१. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,५८,०२० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४६,५७९ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४,५५,४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.१० आहे.

२. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २८,५१२ खाजगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८,०२० विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी २२,५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ८०.३६ आहे.

३. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २४,३७६ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २३,९५४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी ९,४४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ३९.४४ आहे.

४. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून नियमित, खाजगी व पुनर्परिक्षार्थी मिळून एकूण १६,१०,९०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,९८,५५३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४,८७,३९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.०४ आहे.

५. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ९,६७३ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९,५८५ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी ८,८४४ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.२७ आहे.

६. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९८.८२ %) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (९०.७८%) आहे.

७. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३१ आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८३ ने जास्त आहे.

८. माध्यमिक शालान्त (इ.१० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ करीता एकूण ६२ विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी एकूण २४ विषयांचा निकाल १००% टक्के लागला आहे.

९. राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४,८८,७४५ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ४,९७,२७७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३,६०,६३० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, १,०८,७८१ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

१०. राज्यातील २३,४८९ माध्यमिक शाळांतून १५,५८,०२० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७,९२४ शाळांचा निकाल १०० % लागला आहे.

मार्च २०२४ चा निकाल ९५.८१ टक्के आहे व फेब्रु. मार्च २०२५ चा निकाल ९४.१० टक्के आहे. मार्च २०२४ च्या तुलनेत फेब्रु. मार्च २०२५ निकाल १.७१ टक्के ने कमी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com