Byculla Assembly Constituency Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Byculla Assembly Constituency : हाथ देणार का मशालीला साथ, धनुष्यबाण पंतगाची दोरी कापणार? भायखळा विधानसभेत कोण जिंकणार?

Maharashtra Assembly Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. यातच भायखळा विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारू शकतो, याचा राजकीय इतिहास आणि सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.

Satish Kengar

नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला राज्यात मोठं यश मिळालं. तर मुंबईत ठाकरे गटाने चांगली कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं. यातच आता सगळ्याच राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दोन्ही गटाने विशेष करून मुंबईकडे आपलं लक्ष केंद्रित केलं आहे.

मुंबईत विधानसभेच्या एकूण 36 जागा आहेत. यातच आपण आज भायखळा विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारू शकतो, याचा राजकीय इतिहास आणि सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.

भायखळा विधानसभा मतदारसंघाचा इतिहास

भायखळा विधानसभा मतदारसंघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या उमेदवार यामिनी यशवंत जाधव विजयी झाल्या होत्या. त्यांना 51,180 मते मिळाली होती. तर एमआयएम (AIMIM) पक्षाचे उमेदवार वारीस पठाण यांना दुसऱ्या क्रमांकाची 20,023 मते मिळाली होती. याआधी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत वारीस पठाण यांनी विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांनी भाजप उमेदवार मधु (दादा) चव्हाण यांचा 1,357 मतांनी पराभव केला होता. याआधी म्हणजेच 2009 मधील विधानसभा निवडणुकीत मधुकर चव्हाण निवडून आले होते.

या मतदारसांघात कोणत्याही एका पक्षाचं पूर्णपणे वर्चस्व आहे, असं म्हणता येणार नाही. मात्र शिवसेना आणि भाजप यांची एकत्र मिळून येथे मोठी ताकद आहे. तर काँग्रेस आणि एमआयएमचेही येथे मोठ्या संख्येने समर्थक आहेत.

सध्याची राजकीय परिस्थिती

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत यामिनी जाधव विजयी झाल्या होत्या. त्यावेळी शिवसेना ही ठाकरे आणि शिंदे गटात विभागलेली नव्हती. याचा फायदा पक्षाचा उमेदवाराला मिळाला होता. मात्र आता चित्र वेगळं आहे. 2019 ची विधानसभा निवडणूक शिवसेनेने भाजपसोबत युतीत लढवली होती. मात्र नंतर शिवसेनेने वेगळा निर्णय घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात महाविकास आघाडीची स्थापना केली आणि सत्ता स्थापन केली होती.

पुढे एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि शिवसेनेत मोठी खिंडार पाडली. त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेचे आमदार फोडले आणि ठाकरे सरकार कोसळलं. नंतर भाजपसोबत जात शिंदे यांनी सरकार स्थापन केलं आणि मुख्यमंत्री झाले. शिंदे यांच्या बंडात यामिनी जाधव यांनीही त्यांना साथ दिली. आता भायखळा विधानसभा मतदारसंघ हा सध्या शिंदे गटाकडे आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत संभावित उमेदवार

आगामी विधानसभा निवडणुकीत भायखळा विधानसभा मतदासंघात पुन्हा एकदा शिंदे गटाकडून यामिनी जाधव या रिंगणात उतरू शकतात. शिंदे गटाने त्यांना लोकसभा निवडणूक 2024 मध्येही दक्षिण मुंबईमधून संधी दिली होती. म्हणूनच त्यांची उमेदवारी ही निश्चित मानली जात आहे. तर मविआतील मित्र पक्ष ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये येथे रस्सीखेच पाहायला मिळू शकते. कारण 2009 मध्ये येथून काँग्रेचे उमेदवार मधुकर चव्हाण विजयी झाले होते. 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती.

आता येथील सीटिंग आमदार शिंदे गटात असल्याने, जागावाटपात काँग्रेस या जागेची मागणी करू शकते. तर ठाकरे गटही या जागेसाठी आपला पूर्ण जोर लावू शकतो. ठाकरे गट येथून माजी नगरसेवक मनोज जामसुदकर यांना तिकीट देऊ शकतो. तर एमआयएम पक्षाच्या वतीने पुन्हा एकदा वारीस पठाण मैदानात उतरू शकतात. दरम्यान, आगामी विधानसभेत येथून कोणत्या पक्षातून कोणाला तिकीट मिळेल आणि कोण विजयी होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT