चरतत्वाची आपली असणारी रास. प्रवासामधून फायदा होईल. कामाच्या ठिकाणी बढतीचे योग आहेत. सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल. राजकीय प्रगतीचे सुद्धा योग आहेत.
उपासनेला दिवस चांगला आहे. सद्गुरूंची विशेष कृपा आपल्याला लाभेल. कला क्रीडा क्षेत्रात विशेष प्रगती होईल. उच्च शिक्षणाचे योग आहेत.
जोडीदाराच्या कुटुंबीयांकडून धनलाभ होतील. प्रेमामध्ये काहीतरी मोठा निर्णय आज घ्यावा लागेल. त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणावर होतील.
जोडीदाराच्या मागण्या मान्य करण्यामध्ये आज व्यस्त असाल. मग वैवाहिक जीवनाचा जोडीदार आणि व्यवसायाचा भागीदार. दोघांचेही ताळमेळ साधताना त्रेधा उडेल.
आज दिवसभरात कमीत कमी रिस्क घेणे गरजेचे आहे. नको तेवढी ओढाताण आणि ताणतणाव आपले मनस्वास्थ्य खराब करणारे ठरू शकेल. स्वतःचा मोठेपणा न मिरवता कामे केल्यास दिवस बरा जाईल.
शेअर बाजारामध्ये भरारी मारण्याचा दिवस आहे. काहीतरी चांगले गुंतवणूक कराल अर्थात आपली रास बौद्धिक रास असल्यामुळे हिशोब व्यवस्थित करून मार्ग शोधा.
गृहसौख्यआणि मातृसौख्य, वाहन सौख्य याच्यासाठी दिवस सुखदायक आहे. जे ठरवायचे ते कराल. मुख्य म्हणजे आपल्या कुटुंबीयांच्या सहकार्याने पुढे जाण्याचे योग आहेत.
शेजारील व्यक्तीचे सहकार्याने आज पुढे जाणार आहात. अडचणींवर मात करत दिवस पार पडणार आहे. स्वतःच्या पराक्रमावर तुम्हाला अभिमान वाटेल.
आपण केलेल्या कामाचे योग्य श्रेय आपल्याला आज मिळणार आहे. यासाठी जवळच्या लोकांकडून सहकार्य सुद्धा लाभेल. एकत्रितरित्या भोजनाची मेजवानी कुटुंबीयांबरोबर लुटाल.
स्वतःमध्ये व्यस्त राहणे आज योग्य ठरेल. कामांची धावपळ आज नेहमीपेक्षा अधिक असेल. केलेल्या कामामधून आनंद जास्त मिळेल.
न ठरवता खर्च होणार आहेत. संशोधनात्मक कार्यात यश मिळेल. पण कर्ज, अफवा,बंधन अशा काही गोष्टीत आपण अडकण्याची शक्यता आहे.
मैत्रीचे बंध पक्के होतील. सून आणि जावई यांच्याकडून विशेष आदर आजच्या दिवशी मिळणार आहे. विविध लाभ होतील दिवस यशाकडे नेणारा आहे.