Sakshi Sunil Jadhav
भारतीयांच्या आहारामध्ये भाकरीचा समावेश केला जातो. त्यामध्ये ज्वारी आणि नाचणीच्याही भाकरीचा समावेश असतो. पण यामध्ये कोणती भाकरी कोणी कोणत्या रुग्णाने खाऊ नये याबद्दल अनेकांना माहित नसते.
पुढे आपण याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मुळात दोन्ही भाकऱ्या या पौष्टीक असतात. मात्र सर्वांनाच या भाकऱ्या पचतीलच असे नाही. काही लोकांनी बाजरी आणि नाचणीचे सेवन मर्यादित किंवा पूर्णपणे टाळणे आवश्यक आहे.
बाजरी आणि नाचणी फायबरयुक्त असल्याने काहींना गॅस, फुगणे किंवा अॅसिडिटी वाढू शकते. अशांनी प्रमाण मर्यादित ठेवावे.
या धान्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त. किडनीचे आजार असलेल्या रुग्णांनी याचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे.
बाजरी आणि नाचणी ब्लड शुगर कमी करू शकतात. हायपो-ग्लायसेमिया असलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी.
हे धान्य पोट जास्त वेळ भरून ठेवते, त्यामुळे वजन अनावश्यक कमी होणाऱ्या व्यक्तींनी याचे प्रमाण कमी ठेवावे.
नाचणीत 'फायटेट्स' असतात ज्यामुळे आयर्नचे शोषण कमी होते. त्यामुळे आयर्न सप्लिमेंट्स घेणाऱ्यांनी नाचणीचे सेवन वेगळ्या वेळेत करावे.
उच्च फायबरमुळे लहान मुलांना पचण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे मर्यादित प्रमाणात देणे योग्य.