Belapur Assembly Constituency : बेलापुरात कोणाचा झेंडा फडकणार? जागावाटपात भाजप जागा पदरात पाडणार का?

Belapur Assembly Constituency election : आगामी विधानसभा निवडणुकीमुळे इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
बेलापुरात कोणाचा झेंडा फडकणार? जागावाटपात भाजप जागा पदरात पाडणार का?
Belapur Assembly Constituency :Saam tv
Published On

नवी मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सर्व राजकीय पक्षांनी जागावाटपात किती जागा मिळाल्या पाहिजे, यासाठी चाचपणी सुरु केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील विद्यमान आमदारही सक्रिय झाल्या आहेत. बेलापूर विधानसभा मतदारसंघात मंदा म्हात्रे यांना भाजपकडून पुन्हा तिकीट मिळाल्यास, त्या हॅट्रीक साधणार का, हे पाहावे लागेल. त्यामुळे नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघावरही सर्वांचं विशेष लक्ष असणार आहे.

विधीमंडळात बेलापूर विधानसभा मतदारसंघाचं भाजप नेत्या, आमदार मंदा म्हात्रे प्रतिनिधित्व करतात. आमदार मंदा म्हात्रे या २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत 87,858 मते घेऊन विजयी झाल्या होत्या. तर याच मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक गावडे यांनी दुसऱ्या क्रमांची मते मिळवली होती. या दोन्ही उमेदवारांच्या मतांमध्ये ४३,५९७ इतक्या मतांचा फरक होता. याअर्थी या मतदारसंघात मंदा म्हात्रे यांनी एकतर्फी विजय मिळवला होता.

बेलापुरात कोणाचा झेंडा फडकणार? जागावाटपात भाजप जागा पदरात पाडणार का?
Belapur Fort: 'बेलापूर' किल्ल्याचा इतिहास खूपच रंजक, नाव कसं पडलं?

२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतही मंदा म्हात्रे यांनीच बाजी मारली होती. मात्र, २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मंदा म्हात्रे यांनी निसटता विजय मिळवला होता. त्यावेळी मंदा म्हात्रे यांना ५५,३१६ मते मिळाली होती. तर २०१४ साली झालेल्या विधानसभेच्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढलेल्या गणेश नाईक यांचा अवघ्या १४९१ मतांनी पराभव झाला होता. पुढे २०१९ साली गणेश नाईक यांनी त्यांचे पुत्र माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह ४८ नगरसेवकांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला.

आमदार मंदा म्हात्रे यांनी २०१४ साली गणेश नाईक यांच्यावर जहरी टीका करत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्ष सोडताना गणेश नाईक हे एकाधिकारशाहीने वागतात, असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर झालेल्या २०१४ सालच्या विधानसभेच्या निवडणुकीत मंदा म्हात्रे यांनी बाजी मारली होती. पुढे २०१९ साली गणेश नाईक देखील भाजपमध्ये आल्याने या मतदारसंघात भाजपची ताकद वाढली. या विधानसभा मतदारसंघात भाजपचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे.

बेलापूर विधानसभा मतदारसंघात आता गणेश नाईक यांच्या समर्थकांनीही चाचपणी सुरु केली आहे. या मतदारसंघात गणेश नाईक यांच्या समर्थकांनी कार्यालयही थाटलं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ कोणाच्या पारड्यात पडणार, हे पाहावं लागणार आहे.

विद्यमान आमदार भाजपचा असल्याने त्यांच्याच वाट्याला ही जागा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांच्या समर्थकांनीही तयारी सुरु केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा पराभव केला.

बेलापुरात कोणाचा झेंडा फडकणार? जागावाटपात भाजप जागा पदरात पाडणार का?
Belapur Station : जागा एकच पण रेल्वे स्टेशन दोन, नावही त्यांचे वेगळे

लोकसभेच्या निकालानुसार महायुतीसाठी बेलापूर विधानसभा मतदारसंघ पोषक असल्याचं बोललं जात आहे. तर महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात कोणाला संधी मिळते, याच्याकडेही साऱ्यांचं लक्ष असणार आहे. शिवसेना नेते आनंद दिघे हयात असताना या मतदारसंघात शिवसेनेची ताकद होती. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपात कोणत्या पक्षाला जागा मिळते, हे पाहावे लागेल. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्याचं समीकरण बदललं आहे. त्यामुळे बेलापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com