गिरीश कांबळे, साम टीव्ही
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या काही विद्यमान आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईतही शिवसेनेच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निकालावर लाटेपेक्षा त्सुनामी आल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ' जणूकाही लाटेपेक्षा त्सुनामी आली असा निकाल दिसत आहे. जनतेला पटलं की नाही, असं देखील दिसत आहे. या सरकारला कोणतं विधायक पास करायचं असेल तर पटलावर ठेवायची गरज नाही. विरोधी पक्ष शिल्लक ठेवायचं नाही असं सुरू आहे. काही दिवसांचे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटलं होतं की, विरोधी पक्ष शिल्लक राहणार नाही'.
'आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित आहे. पटलं नाही तरी लागलं आहे. जे जिंकले, त्यांचे मी अभिनंदन करतो. ज्यांनी प्रामाणिकपणे मते दिली, त्यांचे आभार. लाटेपेक्षा त्सुनामी आली असा आहे. जे काही आकडे दिसत आहेत, ते पाहिल्यावर या सरकारला अधिवेशनात एकापेक्षा अधिक बिल मांडत येईल, अशी परिस्थिती आहे', असे ठाकरे पुढे म्हणाले.
'आता यांना वन नेश वन पार्टी असे त्यांच्या मनासारखे होईल. लोकांनी महायुतीला मत का दिले? सोयाबीन कापूस खरेदी होत नाही म्हणून दिली का? कोणत्या रागापोटी अशी ही लाट उसळी हे कळलं नाही. हा निकाल अनाकलनीय आहे, याचे गुपित शोधल्याशिवाय समजणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
'जर तसे असेल तर बाकीच्या गोष्टी उघड आहेत. बेरोजगारी बेकारी आणि अत्याचार वाढत आहेत. लाडक्या बहिणी आमच्या सभेला येत होत्या. महागाई वाढते आहे. यावेळी तरी भाजपचा मुख्यमंत्री होईल. महाविकास आघाडीचे चुकले असेल. लाट उसळले, त्याचे कारण काय हे त्यांनी दाखवावं. आता शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती करावी लागेल. लाडक्या बहिणींना २१०० रुपये करावे हे कधी करतात ते पाहू, असे ठाकरे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.