Election results 2024 Maharashtra live : विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे सुरूवातीचे कल हाती आलेले आहेत. पहिल्या कलांमध्ये महायुतीने आघाडी घेतली आहे. सकाळी साडेनऊ वाजेपपर्यंतच्या कलामध्ये महायुतीने १४५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर मविआ १३१ जागांवर आघाडीवर आहे. महायुतीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजप ९२ जागांवर आघाडीवर आहे, तर शिंदेंची सेना २८ जागांवर आघाडीवर आहे. अजित पवारांची राष्ट्रवादीचे उमेदवार २५ जागांवर आघाडीवर आहेत. तर मविआमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाची सुरुवात संथ झाली आहे. काँग्रेसचे उमेदवार ४९ जागांवर आघाडीवर आहेत. राज्यात दहा दिग्गजांची काय स्थिती आहे, कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर? याबाबत जाणून घेऊयात
बाळासाहेब थोरात पिछाडीवर - ,
संगमनेरमधून बाळासेहब थोरात पिछाडीवर आहेत. बाळासाहेब थोरात यांना टपाली मतपत्रिकेत आघाडी मिळाली होती. पण ईव्हीएम मशीनमून मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर बाळासाहेब थोरात पिछाडीवर पडले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे Amol Khatal यांनी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या फेरीनंतर बाळासाहेब थोरात सहा हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
माहीम -
माहीमची तिरंगी लढत चुरशीची होत आहे. कधी अमित ठाकरे आघाडीवर तर कधी महेश सावंत आघाडीवर जात आहे. साडेनऊ वाजता ठाकरेंचे महेश सावंत यांनी मोठी आघाडी घेतली आहे. शिंदेंचे सरवणकर तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
येवल्यातून छगन भुजबळ पिछाडीवर आहे. भुजबळ १०० मतांनी पिछाडीवर आहेत. येवल्यात मराठा फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी यांनी येवल्यात सभा घेतली होती, त्यांनी भुजबळांविरोधात आक्रमक भाष्य केले.
अमरावतीमध्ये काय ?
पहिल्या फेरीत अमरावतीच्या अचलपूरमधून प्रहारचे उमेदवार बच्चू कडू पिछाडीवर आहेत. भाजपचे प्रविण तायडे 1401 मतांनी आघाडी घेतली.
वरळीत आदित्य ठाकरे यांच्याकडे आघाडी -
वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांनी आघाडीवर आहेत. तिरंगी लढतीमध्ये आदित्य ठाकरे यांनी टपाली मतमोजणीत आघाडी घेतली होती. त्यानंतर पहिल्या फेरीत आदित्य ठाकरेंनी आघाडी कायम राखली आहे. आदित्य ठाकरे पहिल्या फेरीत ४९५ मतांनी आघाडीवर आहेत.
आदित्य ठाकरे - ४,२३१
मिलिंद देवरा - ३,७३६
संदीप देशपांडे - २,३९९
बारामतीमधून अजित पवार आघाडीवर -
काका पुतण्याच्या लढतीत बारामतीमध्ये सुरुवातीच्या कलात काकांनी आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीनंतर अजित पवार यांनी मोठी आघाडी घेतली आहे. युगेंद्र पवार पिछाडीवर आहेत. टपाली मतमोजणीत युगेंद्र पवार यांनी आघाडी घेतली होती. पण ईव्हीएम मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्याच फेरीत आघाडी घेतली.
धाराशिवमध्ये तानाजी सावंत पिछाडीवर -
परंडा- विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरीअखेर महायुतीचे तानाजी सावंत 529 मतांनी पिछाडीवर आहेत. शरद पवार गटाचे राहुल मोटे यांनी आघाडी घेतली आहे.
शिर्डी विधानसभा मतदारसंघातून विखे पाटील यांनी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या फेरी अखेर भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील 6332 मतांनी आघाडीवर आहेत.
पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांची मोठी आघाडी घेतली आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघ
पहिली फेरी मध्ये चंद्रकांत पाटील यांना तब्बल 8101 मतं मिळाली आहेत. चंद्रकांत मोकाटे 2352 तर किशोर शिंदे 592 मते मिळाली आहेत. चंद्रकांत पाटील यांचे मताधिक्य 5749 मिळाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठ्या फरकाने आघाडीवर आहे.त. तर दीलीप वळसे पाटील १५० मतांनी पिछाडीवर आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव सहा हजार मतांनी आघाडीवर आहेत.
औरंगाबाद पूर्व मधून अतुल सावे पिछाडीवर आहेत. जलील यांना मोठी आघाडी मिळाली.
अब्दुल सत्तार सिल्लोडमधून जवळपास तीन हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.