Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Maharashtra Election Result: राज्यात १६० जागांवर महायुतीचा विजय होणार असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकात पाटील यांनी व्यक्त केला आहे.
Chandrakant Patil
Chandrakant Patilsaam tv
Published On

राज्याच्या विधानसभा निवडणूकीचा निकाल अखेर आज लागणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान यावेळी राज्यात १६० जागांवर महायुतीचा विजय होणार असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकात पाटील यांनी व्यक्त केला आहे. मतमोजणी दरम्यान चंद्रकांत पाटील काय म्हणाले ते पाहूयात.

Chandrakant Patil
Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

चंद्रकांत पाटील म्हणाले की, "कोथरूडमध्ये फक्त लीड मोजायचा आहे. या ठिकाणच्या जनतेशी माझी नाळ इतकी जोडली गेलीये की, त्यामुळे मोठ्या मताधिक्याने माझा विजय होईल, हे निश्चित आहे. राज्यात 160 पेक्षा जास्त महायुतीला मिळणार आहे. या निकालानंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण हे दिल्ली भाजपचे पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल.

पाटील पुढे म्हणाले की, राज्यात लोकसभेनंतर केलेली काम दिलेले योजनांचा आलेले निकालात फायदा दिसून येतोय. विरोधकांनी चुरस निर्माण केल्याचा प्रयत्न केला पण तसं झालं नाही"

Chandrakant Patil
Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

मतमोजणीत चंद्रकांत पाटील आघाडीवर

पुण्यातील कोथरूड मधून चंद्रकांत पाटील जवळपास ७००० पेक्षा अधिक मतांनी आघाडीवर असल्याची माहिती आहे. याशिवाय पोस्टल मतांमधून चंद्रकांत पाटील आघाडीवर होते. चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात शिवनेसा उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत मोकाटे आणि मनसेचे किशोर शिंदे उभे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com