jitendra awhad  Saam tv
Maharashtra Assembly Elections

Mumbra Kalwa : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मुंब्रा-कळव्यात जितेंद्र आव्हाडांसमोर कोणाचं आव्हान? अजित पवार गटाकडून विधानसभेची चाचपणी सुरु

mumbra kalwa assembly constituency : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मुंब्रा-कळव्यात जितेंद्र आव्हाडांच्या सहकाऱ्यांनी त्यांची साथ सोडली. आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी अजित पवार गटाला साथ दिली. त्यामुळे आव्हाडांपुढे सहकाऱ्यांचंच मोठं आव्हान असण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

ठाणे : आगामी विधानसभा निवडणुकीचं बिगुल ऑक्टोबर महिन्यात वाजण्याची शक्यता आहे. या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राज्यातल राजकीय समीकरण बदलून गेलं आहे. त्याचप्रमाणे मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातही राजकीय समीकरण बदललं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातही पक्ष फुटीचे पडसाद उमटताना दिसत आहेत. तीन वेळा विधानसभेत मुंब्रा-कळव्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या समोर यंदा अजित पवार गटाचं कडवं आव्हान असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या मतदारसंघात शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही गटात विधानसभेची लढाई होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ हा कल्याण लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी १,०९,२८३ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांना पराभवाची धूळ चारली होती. ७५,६३९ मतांच्या फरकाने दीपाली सय्यद यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतही जितेंद्र आव्हाड यांनी ८६,५३३ मते मिळवत शिवसेनेच्या दशरथ काशीनाथ पाटील यांचा पराभव केला होता. २०१४ झालेल्या निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांनी ४७,६८३ मतांच्या फरकाने शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्याआधी २००९ साली झालेल्या निवडणुकीतही आव्हाड जिंकले होते. मागील तीन विधानसभा निवडणुकीपासून जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा-कळव्याचं प्रतिनिधित्व करत आहेत. जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात.

अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले पडली. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर माजी खासदार आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी अजित पवार गटाला साथ दिली. राष्ट्रवादीतील दोन बड्या नेत्यांनी अजित पवार गटाची वाट धरत थेट जितेंद्र आव्हाड यांनाच मोठं आव्हान दिलं. राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या मुंब्रा-कळव्यात शिवसेना,भाजपची फार जादू चालताना दिसत नाही. याच मुस्लिम बहुल वस्ती असलेल्या मुंब्रा-कळव्यात आता अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केल्याची चर्चा आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून पुन्हा जितेंद्र आव्हाड यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यास त्यांच्यासमोर नजीब मुल्ला यांचं मोठं आव्हान असणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. तर दोन दिवसांपूर्वीच शरद पवार गटाच्या ८ माजी नगरसेवकांनी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे विधानसभेपूर्वी पक्षातील गळती रोखण्याचंही आव्हान जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT