Mumbra Shiv Sena Shakha: यापुढे मुंब्रात कुठल्याही इमारतीवर कारवाई केल्यास, आव्हाडांनी प्रशासनाला दिला इशारा, म्हणाले...

Jitendra Awhad News: यापुढे मुंब्रात कुठल्याही इमारतीवर कारवाई केल्यास, आव्हाडांनी प्रशासनाला दिला इशारा, म्हणाले...
Jitendra Awhad On Mumbra Shiv Sena Shakha
Jitendra Awhad On Mumbra Shiv Sena ShakhaSaam Tv
Published On

>> हिरा ढाकणे

Jitendra Awhad On Mumbra Shiv Sena Shakha:

मुंब्र्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात शाखेवरून वाद सुरू आहे. ठाकरे गटाची शाखा तोडल्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे त्या ठिकाणी पोहोचले होते. यानंतर येथे वातावरण खूपच तापलं होतं.

मात्र ते शाखेची पाहणी न करताच परतले होते. यानंतर शिंदे गटाने त्यांचा बार फुसका होता असं म्हणत टीका केली होती. मात्र जी शाखा तोडण्यात आली होती, तिथेच आता सत्ताधारी पक्षाकडून नवीन शाखेचे बांधकाम जोरात सुरु असल्याचं ट्वीट राष्ट्रवादीचे नेते जीतेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jitendra Awhad On Mumbra Shiv Sena Shakha
Moto Razr 40 Ultra: जबरदस्त ऑफर! Moto च्या फोल्डेबल फोनव मिळत आहे 17000 रुपयांची सूट

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

जितेंद्र आव्हाड ट्वीट करत म्हणाले आहेत की, ''गेले 8 दिवस चर्चेत असलेली मुंब्रा परिसरातील शाखा ही मला वाटले होते की, त्याचे काम पोलीस आणि ठाणे महानगरपालिका प्रशासन मिळून थांबवतील. काम थांबवण तर सोडाच, काम दुप्पट वेगाने आजही सुरु आहे.'' ट्वीटसोबत त्यांनी एक व्हिडीओही पोस्ट केला आहे.  (Latest Marathi News)

त्यांनी ठाणे महानगरपालिका आणि पोलिसांना हे ट्वीट टॅग करत म्हटलं आहे की, ''या दोघांनी ठाणे शहरात अनधिकृत बांधकामांना आता परवानगी द्यावी. तुमच्याकडे येण्याची काहीही गरज नाही. ज्याला वाट्टेल तिथे त्याने बांधकाम करावं. त्याला कोणीही अडवणार नाही.''

Jitendra Awhad On Mumbra Shiv Sena Shakha
Chhattisgarh Election: सत्तेत राहिल्यास महिलांना 15000 रुपये देणार, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

ते पुढे म्हणाले की, खासकरून ही जमीन गुरुचरण आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने काहीही करण्यास बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी यांनी आता याकडे लक्ष द्यावं, अन्यथा सगळ्याच शासकीय जमिनी खुल्या करून ठेवाव्यात. म्हणजे जनतेला हे बांधकाम करायचं आहे ते जनता करेल. यापुढे मुंब्रा परिसरातील कुठल्याही इमारतीवर कारवाई करण्यासाठी प्रशासन गेल्यास त्यांना विरोध करण्याचं काम माझं असेल.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com