Chhattisgarh Election: सत्तेत राहिल्यास महिलांना 15000 रुपये देणार, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

Chhattisgarh Grih Laxmi Yojna: सत्तेत राहिल्यास महिलांना 15000 रुपये देणार, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
Chhattisgarh Assembly Election 2023
Chhattisgarh Assembly Election 2023Saam Tv
Published On

Chhattisgarh Assembly Election 2023:

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिवाळीच्या दिवशी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता राहिल्यास ‘छत्तीसगड गृह लक्ष्मी योजना’ सुरू करण्यात येईल, असे ते म्हणाले. ज्या अंतर्गत महिलांच्या खात्यात दरवर्षी 15,000 रुपये दिले जातील. यापूर्वी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या जाहीरनाम्यात महिलांना 12 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.

मुख्यमंत्री बघेल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे की, ''आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, देवी लक्ष्मी छत्तीसगडला अपार आशीर्वाद देवो. माझा छत्तीसगड श्रीमंत झाला पाहिजे आणि आपण गरिबीचा शाप नाहीसा करू, या संकल्पाने आमच्या सरकारने पाच वर्षे काम केले आहे. आज दिवाळीच्या शुभ दिवशी, आपण आपल्या माता-भगिनींना अधिक समृद्ध आणि सक्षम पाहू इच्छितो.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chhattisgarh Assembly Election 2023
Muhurat Trading: दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ट्रेडिंगला सुरुवात; सेन्सेक्सने घेतली 500 अंकांची उसळी, निफ्टी 100 अंकांनी वर

ते म्हणाले, 'आज या शुभ प्रसंगी मी घोषणा करतो की, तुम्ही काँग्रेसला मत द्या, छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन करा, आम्ही ‘छत्तीसगढ गृह लक्ष्मी योजना’ सुरू करू, ज्याअंतर्गत आम्ही प्रत्येक महिलेला वर्षाला 15,000 रुपये देऊ.'' (Latest Marathi News)

बघेल म्हणाले की, "मी सर्व माता भगिनींना सांगू इच्छितो की, तुम्हाला रांगेत उभं राहण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही. सरकार तुमच्यासाठी स्वत:चे सर्वेक्षण करेल. सर्व काही ऑनलाइन असेल आणि पैसे थेट तुमच्या खात्यात येतील.''

Chhattisgarh Assembly Election 2023
Volvo XC40 Petrol: भारतात Volvo XC40 पेट्रोल मॉडेलची विक्री बंद, काय आहे कारण?

भाजपने 12 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिलं

छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची ही घोषणा भाजपच्या 'महतारी वंदन योजने'ला उत्तर मानली जात आहे. या योजनेअंतर्गत छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार आल्यास प्रत्येक विवाहित महिलांच्या खात्यात वर्षाला 12 हजार रुपये जमा केले जातील, असे आश्वासन भाजपने दिले आहे. भाजपच्या सूत्रांनी सांगितले की, या घोषणेनंतर पक्षाने महिलांकडून 'महतारी वंदन योजने'चे फॉर्म भरून घेण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com