Maharashtra Politics Indian Express
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics: साखरेवर भेट की विधानसभा थेट? शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीमागील रहस्य काय?

Maharashtra Politics: भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. दोन्ही नेत्यांची बंद दाराआड चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कशावरुन चर्चा झाली ही माहिती असून गुलदस्यात आहे.

Bharat Jadhav

भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांची पुण्यात बंद दाराआड भेट झाल्यामुळे राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलंय. वसंत दादा शुगर इन्स्टिट्युमध्ये झालेल्या या भेटीत विधानसभेबाबत साखर पेरणी झाली की खरंच कारखानदारीवर चर्चा झाली? हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार की फडणवीस उमेदवारीबाबत शब्द पाळणार ? यावरचा हा रिपोर्ट

विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी महायुतीचे मोहरे गळाला लावायला सुरुवात केलीय. तुतारी फुंकण्याची चर्चा सुरू असतानाच फडणवीसांचे निकटवर्तीय भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे भाजपमधल्या अनेकांच्या भुवय़ा तर उंचावल्या आहेतच. मात्र राजकीय विश्वात चर्चांना आणखीनच उधाण आलंय. कारण पवारांसोबतची भेट राजकीय नसल्याचं सांगतानाच हर्षवर्धन पाटलांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना इंदापूरची जागा सोडण्याच्या आश्वासनाची आठवण करून दिली.

महायुतीत ज्यांचा विद्यमान आमदार त्यांना ती जागा असं सूत्र ठरल्याची चर्चा आहे. त्यामुळे इंदापूरमधून दादांच्या पक्षाचे दत्तात्रय भरणे विद्यमान आमदार असल्याने त्यांचाच दावा मजबूत असल्याचं मानलं जातंय. लोकसभेत अजितदादांना मदत केल्यास विधानसभेत हर्षवर्धन पाटलांना मदत अशी डील झाल्याचं बोललं जातंय. मात्र लोकसभेत इंदापूरमधून सुनेत्रा पवारांऐवजी सुप्रिया सुळेंना लीड मिळालं. त्यामुळे अजितदादा शब्द पाळतील का याबाबत हर्षवर्धन पाटील साशंक आहेत. आणि हीच संधी साधण्याच्या तयारी पवारांची राष्ट्रवादी आहे. त्यामुळेच सुळेंनीही तसे संकेत दिले होते.

स्थानिक पातळीवरील निधी आणि विकासकामांच्या श्रेयावरून अजित पवारांकडून इंदापूरमध्ये काटशहाचं राजकारण केलं जात असल्याची तक्रार अनेकदा हर्षवर्धन पाटलांनी जाहीररित्या केलीय. त्यामुळेच या अस्वस्थेचा फायदा उचलण्यात पवार यशस्वी होणार की हर्षवर्धन पाटलांना इंदापूरची जागा देण्यात फडणवीस यश येणार यावर हर्षवर्धन पाटलांची राजकीय दिशा ठरणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Maharashtra Exit Poll: मेहकरमध्ये शिंदे गटाचे संजय रायमुलकर होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Assembly Election: निकालाआधीच महाविकास आघाडीमध्ये पडद्यामागं काही तरी घडतंय?

SCROLL FOR NEXT