Maharashtra Election Results  saam tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election Results: शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विजयाचा साताऱ्यात जल्लोष, पाहा व्हिडीओ

Maharashtra Election Results : सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निकालावर सर्व जनतेचं लक्ष होतं.

Surabhi Jayashree Jagdish

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने भरघोस यश दिलंय. या निवडणूकीच्या निकालानंतर भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यावेळी सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निकालावर सर्व जनतेचं लक्ष होतं. आणि जशी अपेक्षा होती त्याचनुसार याठिकाणी शिवेंद्रसिंहराजेंना एक लाख ७५ हजार ६२ मतं मिळाली.

यावेळी शिवेंद्रराजे तब्बल एक लाख ४२ हजार १२४ च्या मताधिक्याने निवडून आले. यावेळी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून आल्यानंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांसमोर एकच जल्लोष केला.

हजारो कार्यकर्त्यांसमोर, नाद करायचा नाही...आमचा नाद करायचा नाही या गाण्यावर थिरकले आमदार शिवेंद्रराजे भोसले. 1,42,124 एवढ्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्यानंतर शहरातून मिरवणूक काढल्यानंतर गांधी मैदान परिसरात आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि त्यांच्या हजारो समर्थकांनी केल्याचं दिसून आलं.

भाजप महायुतीचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले माध्यमांशी बोलताना म्हणाले की, माझ्यावर जो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विश्वास आखवला तो मी अखेर सार्थ केला आहे. मी माझ्या मतदार संघातील मतदार बांधवांचे जाहीर आभार मानतो.

सातारा-जावळी विधानसभा मतदार संघातील निवडणूकीसाठी भाजपकडून शिवेंद्रसिंहराजे तर शिवसेना उध्‍दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अमित कदम यांना उमेदवारी देण्‍यात आली होती. राजकारणात अनेक वर्षे एक्टिव्ह असले तरी शिवेंद्रसिंहराजेंच्‍या तुलनेत अमित कदम हे तुल्‍यबळ दिसून येत नव्‍हते. यामुळे या ठिकाणची निवडणूक एकतर्फी होणार असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

२०१९ च्या विधानसभेचा निकाल

  • शिवेंद्रराजे भोसले (भाजपा) – १,१८,००५

  • दीपक पवार (राष्ट्रवादी) – ७४,५८१

  • अशोक गोरखनाथ दीक्षित (वंचित) – ३१५३

२०१४ च्या विधानसभेचा निकाल

  • शिवेंद्रराजे भोसले (राष्ट्रवादी) – ९७,९६४

  • दीपक पवार (भाजपा) – ५०,१५१

  • दगडू सकपाळ (शिवसेना) – २५,४२१

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

SCROLL FOR NEXT