Chinchwad Assembly Constituency Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Chinchwad Assembly Constituency: चिंचवडमध्ये अश्विनी जगताप गड राखणार? जाणून घ्या काय आहे राजकीय गणित

Priya More

चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील महत्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपची सत्ता आहे. या मतदरारसंघामध्ये भाजपच्या अश्विनी जगताप या विद्यमान आमदार आहेत. हा मतदारसंघ स्वर्गीय लोकनेते आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. पण लक्ष्मण जगताप यांच्या अकाली निधनानंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये पोट निवडणूक झाली. भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना संधी देण्यात आली. या पोटनिवडणुकीमध्ये त्या निवडून आल्या.

चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये २००९ पासून लक्ष्मण जगताप यांचीच सत्ता होती. २००९ ची निवडणूक त्यांनी अपक्ष लढवली होती. त्यानंतर २०१४ ची निवडणूक त्यांनी भाजपकडून लढवली. या निवडणुकीमध्ये विजयी होत त्यांनी पुन्हा चिंचवड विधानसभा मतदारसंघावर आपली सत्ता कायम ठेवली. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत देखील ते विजयी झाले. पण २०२३ मध्ये लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यानंतर या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक झाली आणि लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या विजयी झाल्या. या निवडणुकीमध्ये अश्विनी जगताप १,३५,६०३ मते मिळवून विजयी झाल्या. अश्विनी जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विठ्ठल उर्फ ​​नाना काटे यांचा पराभव केला होता.

चिंचवड विधानसभा क्षेत्रात लक्ष्मण जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अप्रत्यक्ष पाठिंब्याने निवडून यायचे. मात्र त्यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला. चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. २०२३ च्या पोटनिवडणुकीत लक्ष्मण पांडुरंग जगताप यांची पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने विठ्ठल उर्फ नाना काटे यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत देखील नाना काटे हे अजित पवार गटाकडे चिंचवड विधानसभेची उमेदवारी मागण्यासाठी जोर धरत आहेत. तर लक्ष्मण जगताप यांचे धाकटे भाऊ शंकर जगताप हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

२०२३ ची विधानसभा पोटनिवडणूक -

लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या पोट निवडणुकीमध्ये अश्विनी जगताप यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती. अश्विनी जगताप यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमध्ये अश्विनी जगताप १,३५,६०३ मतांनी विजयी झाल्या होत्या. नाना काटे यांना ९९,४३५ मतं मिळाली होती.

२०१९ ची विधानसभा निवडणूक -

चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप आणि अपक्ष उमेदवार राहुल कलटे यांच्यात चुरशीची लढत झाली होती. या मतदारसंघामध्ये भाजपला सत्ता मिळवण्यात यश आले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्ष्मण जगताप १,५०,७२३ मतांनी विजयी झाले होते. तर अपक्ष उमेदवार राहुल कलटे यांचा पराभव झाला होता. त्यांना १,१३,२२५ मतं मिळाली होती.

२०१४ ची विधानसभा निवडणूक -

चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप आणि अपक्ष उमेदवार राहुल कलटे यांच्यात निवडणुकीचा सामना रंगला होता. या निवडणुकीत भाजपला सत्ता स्थापन करण्यात यश आले होते. लक्ष्मण जगताप १,२३,७८६ मतांनी विजयी झाले होते. तर अपक्ष उमेदवार राहुल कलटे यांचा पराभव झाला होता. त्यांना ६३,४८९ मतं मिळाली होती.

२००९ ची विधानसभा निवडणूक -

चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये २००९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप आणि शिवसेना उमेदवार अप्पा उर्फ श्रीरंग चंदू बरन यांच्यात लढत झाली होती. या मतदारसंघामध्ये लक्ष्मण जगताप विजयी झाले होते. लक्ष्मण जगताप ७८,७४१ मतांनी विजयी झाले होते. तर शिवसेना उमेदवार अप्पा उर्फ ​​श्रीरंग चंदू बरनयांचा पराभव झाला होता. त्यांना ७२,१६६ मतं मिळाली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT