
या आठवड्यात कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील, त्यामुळे तुमची प्रगती होईल. आर्थिक बाजू बळकट होईल. कौटुंबिक जीवनात काही मतभेद होऊ शकतात, परिस्थिती शांतपणे हाताळा, आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील, मानसिक शक्तीवर त्या निभावून न्याल. वाहने जपून चालवा. खर्च होण्याची शक्यता जास्त आहे.
हा आठवडा तुमच्यासाठी शुभ राहील. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण अनुभवाल, नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. व्यवसायात लाभ होईल. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी आश्वासक बातमी येण्याची शक्यता आहे. नोकरीत चांगले यश मिळेल. विशेषतः सरकारी कामे मार्गी लागतील.
आर्थिक बाबतीत सावध राहा. अनावश्यक खर्च टाळा. व्यावसायिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात, परंतु तुम्ही त्यांवर मात कराल. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, विद्यार्थ्यांनी करमणुकीत रमून न जाता प्रयत्नशील राहावे. या आठवड्यात उत्साह, धाडस आणि प्रयत्नांत वृद्धी होईल.
या आठवड्यात तुमचे मन शांत राहील. अडकलेली कामे पूर्ण होतील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत वेळ घालवाल. आरोग्य उत्तम राहील, नोकरीत वरिष्ठांशी वादामुळे पूर्वी जो त्रास झाला आहे, तो सध्या शांत होईल. कामे सहज पूर्ण होतील. सुखद बातमी मिळेल.
कामाच्या ठिकाणी यश मिळेल, कुशल नेतृत्वामुळे तुम्हाला मान-सन्मान मिळेल, विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कौटुंबिक जीवनात तणाव जाणवू शकतो. मित्रांचे सहकार्य लाभेल. ग्रहमान अनुकूल असल्याने आत्मविश्वासात वाढ होईल, मोठे काम मिळण्याची शक्यता.
या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहील. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफा होईल. कौटुंबिक कारणांवरून मानसिक शांतता ढळू देऊ नका. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. नोकरीतील कामाच्या दृष्टीने आठवड्याची सुरुवात चांगली होईल. चांगली बातमी मिळेल, सहकाऱ्यांसोबत चांगला ताळमेळ राहील.
कामात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. विद्यार्थ्यांसाठी कष्टांचा काळ, प्रयत्न करत राहा. विवाहेच्छुकांना योग्य स्थळ मिळेल, कामातून वेळ काढून छंद जोपासा. खर्च जपून करा. आठवड्याच्या सुरुवातीला अनावश्यक मनस्ताप होईल. इतरांच्या भानगडीत पडू नका.
कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील, आरोग्याची काळजी घ्या भागीदारीतील जुने वाद मिटवण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबीयांसोबत वेळ घालवाल. या आठवड्यात जमिनीसंबंधी प्रकरणात फायदा होईल. आठवड्याभरात जे कार्य कराल त्यात यश मिळेल.
कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील, तुमच्या कामामुळे नोकरीत मान-सन्मान वाढेल. आर्थिक बाजू बळकट होईल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील, विवाहेच्छुकांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता, अनावश्यक खर्चात वाढ होण्याची शक्यता. शत्रू आणि आरोग्यासंबंधी समस्यांत वाढ होण्याची शक्यता.
या आठवड्यात तुमच्या कामाची प्रशंसा होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी योग्य संधी मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख-समाधान राहील. श्वसनाच्या तक्रारी जाणवण्याची शक्यता. विचार न करता काम केल्याने महिन्याच्या सुरुवातीला त्रास होईल. एकच काम अनेक वेळा करावे लागेल.
कामात यश मिळेल. तुमच्या विचारांना नवी दिशा मिळेल, शेअर मार्केटसंबंधित व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुख-शांती राहील. मित्रांशी भेटीगाठी होण्याचे योग आहेत. सप्ताहाचा शेवट समाधानकारक बातमी घेऊन येण्याची शक्यता. अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्याने उत्साहात वाढ होईल.
या आठवड्यात व्यावसायिकांना जुनी धोरणे अंमलात आणण्यात यश मिळेल. तुमच्या कामामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. सप्ताहाच्या मध्यावर परदेशातून आनंदवार्ता येण्याची शक्यता. आठवड्याचा प्रारंभउत्तम राहील, धनलाभ होईल. समस्यांपासून दूर राहाल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.