Maharashtra Politics : माढ्याचं राजकारण तापलं! शरद पवार यांच्या मतदारसंघावर काँग्रेसचा दावा!

Madha Politics, Sharad Pawar : सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माढा मतदारसंघावर दावा करण्यात आलाय.
Sharad Pawar
Sharad Pawar Saam Tv
Published On

Madha Assembly constituency : लोकसभा निवडणुकीत राज्यात माढा मतदारसंघ चर्चेत होता. भाजप आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीमध्ये लढत झाली. यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Patil) यांनी भाजपच्या निंबाळकर यांचा पराभव केला. आता पुन्हा एकदा माढ्याचं राजकारण (Madha Politics) तापलेय. माढा मतदारसंघ पारंपारिक शरद पवारांचा (Sharad Pawar) मतदारसंघ आहे. यावर आता काँग्रेसने (COngress) दावा केला आहे. काँग्रेसकडून धनाजी साठे (Dhanaji Sathe) यांनी माढा मतदारसंघाबाबत मागणी केली आहे. मीनल साठे (Minal Sathe) यांना काँग्रेसकडून माढ्यासाठी उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी आज माजी आमदार धनाजी साठे यांनी केली आहे.

Sharad Pawar
Special Report: उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचंय? नेमकं प्रकरण काय?

माढ्याचं राजकारण तापलं, काँग्रेसकडून दावा -

सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माढा मतदारसंघावर दावा करण्यात आलाय. माजी आमदार धनाजी साठे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून माढा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा घेतला. माढा नगरपंचायत नगराध्यक्षा मीनल साठे यांना माढा मतदार संघातून काँग्रेसकडून उमेदवारी देण्याची यावेळी कार्यकर्त्यांनी मागणी केली. त्याला साठेंनीही दुजोरा दिल्याचं समजतेय.

Sharad Pawar
Maharashtra Politics : अजितदादांना धक्का, माढ्याचे आमदार शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट, बंद दाराआड चर्चा!

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच -

काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून माढा मतदारसंघातून जनसंवाद यात्रा काढण्यात येणार आहे. माढा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धर्म पाळून काँग्रेसने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यात आला होता. महाविकास आघाडीकडून माढा विधानसभा मतदारसंघातून मीनल साठे यांना उमेदवारी द्यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. माढा विधानसभा संघावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Sharad Pawar
Maharashtra Politics: मोठी बातमी! रोहित पवारांना महाविकास आघाडीतूनच विरोध? उमेदवारी न मिळण्यासाठी काँग्रेस- ठाकरे गटाच्या बैठका; राजकारण तापणार!

माढ्यात राडा होण्याची चिन्ह

महाविकास आघाडीतील घटकपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात माढ्यात राडा होण्याची चिन्ह आहेत. माढा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाचे बबन शिंदे आमदार आहेत. पणर बबन शिंदे यांनी त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्या सोबत शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे माढ्यावरून महाविकास आघाडीतील वातावरण तापाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com