
एनडीएने उपराष्ट्रपती पदासाठी सी.पी. राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर केली.
भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत घोषणा केली.
राधाकृष्णन हे भाजपचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत.
त्यांचा दीर्घ राजकीय प्रवास आणि पक्षासाठीचं योगदान महत्त्वाचं मानलं जातं.
उपराष्ट्रपती पदासाठी सीपी राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार असतील. रविवारी झालेल्या एनडीएच्या बैठकीत त्यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी अधिकृत घोषणा केलीय. राधाकृष्णन कोण आहेत, ज्यांना एनडीएने उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार बनवले आहे ते जाणून घेऊया.
महाराष्ट्राचे राज्यपालाचे नाव चंद्रपुरम पोन्नुसामी राधाकृष्णन असं आहे. राधाकृष्णन यांचा जन्म २० ऑक्टोबर १९५७ रोजी तामिळनाडूतील तिरुप्पूर येथे झाला. त्यांनी कोइम्बतूरच्या चिदंबरम कॉलेजमधून बीबीए (बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन) केले. राधाकृष्णन १९७३ मध्ये वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले होते. त्यानंतर त्यांनी जनसंघात प्रवेश केला आणि सक्रिय राजकारणात प्रवेश केला.
सी.पी. राधाकृष्णन हे तामिळनाडूमध्ये भाजपचे अध्यक्ष राहिलेत. त्यांना राज्यपाल म्हणून दीर्घ प्रशासकीय अनुभव आहे. ते २०२४ मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल झाले. ते २४ वे राज्याचे राज्यपाल आहेत. ते कोइम्बतूरमधून दोनदा लोकसभेवर निवडून आले होते. राधाकृष्णन हे दक्षिण भारतातील भाजपच्या सर्वात ज्येष्ठ आणि आदरणीय नेत्यांपैकी एक मानले जातात.
सध्या ते भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्य आहेत. पक्ष नेतृत्वाने त्यांना केरळचे प्रभारी देखील बनवले होते. २०१६ ते २०१९ पर्यंत ते अखिल भारतीय कॉयर बोर्डाचे अध्यक्ष देखील होते. भाजपने त्यांना २००४, २०१२ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कोइम्बतूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
महाराष्ट्र: ३१ जुलै २०२४ पासून राज्यपाल.
झारखंड: १८ फेब्रुवारी २०२३ ते ३० जुलै २०२४ पर्यंत राज्यपाल.
तेलंगणा: मार्च ते जुलै २०२४ पर्यंत अतिरिक्त कार्यभार.
पुदुच्चेरी: मार्च ते ऑगस्ट २०२४ पर्यंत उपराज्यपाल (अतिरिक्त कार्यभार).
१९९८ आणि १९९९ मध्ये कोइम्बतूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.
भाजप संघटनेत निभावलीय महत्त्वाची भूमिका
२००३ ते २००६ पर्यंत तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष होते.
२००४-२००७ दरम्यान तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष असताना, सी पी राधाकृष्णन यांनी ९३ दिवसांची रथयात्रा आयोजित केली होती. याचा उद्देश नद्या जोडणे होता. ते संसदेत वस्त्रोद्योगावरील स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी वित्त आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांशी संबंधित अनेक समित्यांमध्ये काम केलंय. सी.पी. राधाकृष्णन यांची गणना दक्षिण भारतातील भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये केली जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.