Vice President: चर्चा ६ नावांची; वर्णी मात्र महाराष्ट्राच्या राज्यपालांची, राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यामागे काय आहे भाजपचा राजकीय डाव?

Governor CP Radhakrishnan: भाजपने महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन यांना एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. हा निर्णय एक मजबूत राजकीय रणनीती असल्याचं म्हटलं जात आहे
Governor CP Radhakrishnan
BJP nominates Maharashtra Governor Radhakrishnan as NDA’s Vice President candidate, highlighting a strategic political movesaamtv
Published On
Summary
  • उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी राधाकृष्णन यांची भाजपकडून उमेदवारी जाहीर.

  • तीन नावे चर्चेत असूनही राधाकृष्णन यांच्यावर भाजपने शिक्कामोर्तब केलं.

  • महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात राजकीय पकड वाढवण्यासाठी हा डाव असल्याचं मानलं जातं.

  • भाजपच्या या निर्णयावर विरोधकांकडून राजकीय आरोप.

उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या राजीनाम्याच्या नाट्यानंतर राजकारणात मोठी गदारोळ उडाला होता. धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने अनेक तर्क-वितर्क काढले जात होते. राजीनामा का दिला या प्रश्नांचे उत्तर मिळण्याआधीच भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरत पुन्हा एकदा अनेकांना बुचकळ्यात पाडलंय. आज उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएकडून कोण उमेदवार असेल याची घोषणा करण्यात आलीय. (Bjp Nominates Radhakrishnan As Nda’s Vice President Candidate)

उपराष्ट्रपती पदासाठी दिल्लीचे नायब राज्यपाल वीके सक्सेना, बिहारचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांची नावं या बैठकीत आघाडीवर होते. याच्यासह गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, सिक्कीमचे राज्यपाल ओम माथूर आणि जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांची नावे चर्चेत होती. मात्र भाजपनं पुन्हा एकदा नवं धक्कातंत्र वापरत महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी उमेदवारी दिलीय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांच्या नावाची घोषणा केलीय.

Governor CP Radhakrishnan
Duplicate Voter: एका मतदाराचं नाव दोन-दोन ठिकाणी कशी? मृतांचा आकडा वाढला कसा? आयोगानं सांगितली कारणं

राधाकृष्णन यांना संधी का?

महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे मूळचे तामिळनाडूचे आहेत. ते झारखंडचे राज्यपाल देखील होते. यापूर्वी ते तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल म्हणून कार्यरत होते. सीपी राधाकृष्णन हे दोनवेळा लोकसभेवर निवडून आले होते, अशी माहिती भाजप नेते जे. पी. नड्डा यांनी उमेदवाराची घोषणा करताना दिलीय. माध्यमांच्या वृत्तानुसार उपराष्ट्रपतीच्या उमेदवारीसाठी ६ जणांची नावे चर्चेत होती.

Governor CP Radhakrishnan
Vice president Election : उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार ठरला; भाजप अध्यक्षांकडून नाव जाहीर

पण भाजपनं राधाकृष्णन यांना उमेदवारी दिलीय. त्यामागे भाजपचा एक राजकीय डाव खेळलाय. राधाकृष्णन हे मूळचे तामिळनाडूचे असून पुढील वर्षी तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपकडून राधाकृष्णन यांना संधी देण्यात आल्याचाही राजकीय अंदाज बांधला जातोय.

दरम्यान बिहारमधील हिंदुस्थानी आवाम मोर्चा पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनीही राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या नावाला आपला पाठिंबा दर्शवलाय. त्यांनी ट्विट करत पाठिंबा असल्याचं म्हटलंय. जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com