Vice president Election : उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार ठरला; भाजप अध्यक्षांकडून नाव जाहीर

Vice president election update : उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार अखेर ठरला आहे. भाजप अध्यक्षांकडून उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलं.
maharashtra Politics
bjp Saam tv
Published On

एनडीएने उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार जाहीर केला आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उमेदवार म्हणून सीपी राधाकृष्णन यांचं नाव उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे. सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. जेपी नड्डा यांनी भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत एनडीएच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली.

कोण आहेत सीपी राधाकृष्णन?

सीपी राधाकृष्णन यांचा जन्म तामिळनाडूतील तिरुप्परमध्ये २० ऑक्टोबर १९५७ रोजी झाला. चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन हे भाजपचे वरिष्ठ नेते राहिले आहेत. सध्या ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. राधाकृष्णन यांनी राजकीय जीवनाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून झाली. जनसंघाचे ते १९९८ आणि १९९९ साली कोयम्बटूरमध्ये लोकसभा खासदार म्हणून निवडून आले होते. तसेच २००३ आणि २००६ साली तामिळनाडूचे भाजप अध्यक्ष होते.

सीपी राधाकृष्णन फेब्रुवारी 2023 ते जुलै २०२४ पर्यंत झारखंडचे राज्यपाल राहिले आहेत. या व्यतिरिक्त त्यांच्याकडे मार्च ते जुलै २०२४ पर्यंत तेलंगणाचा अतिरिक्त प्रभार देखील सोपवण्यात आला होता. मार्च ते ऑगस्ट २०२४ पर्यंत पुड्डुचेरीचे उपराज्यपाल म्हणूनही अतिरिक्त कार्यभार सांभाळला. ३१ जुलै २०२४ रोजी ते महाराष्ट्राच्या राज्यपालपदी विराजमान झाले.

भाजपचे तामिळनाडू अध्यक्ष असताना त्यांनी ९३ दिवसांची रथ यात्रा काढली. नदी जोड प्रकल्प, दहशतवादाविरोधात जागृकता आणि अस्पृश्यता निर्मुलन हा त्यांच्या रथ यात्रेमागचा उद्देश होता. खासदार असताना त्यांनी वस्त्र उद्योगाच्या स्थायी समितीचंही अध्यक्षपद भूषवलं आहे. राधाकृष्णन यांनी वीओ चिदंबरम कॉलेमधून 'बीबीए'चं पदवी प्राप्त केली आहे.

एनडीएकडून उमेदवारी जाहीर होताच सीपी राधाकृष्णन यांनी पत्नीसोबत श्री सिद्धविनायक मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतल्याचे 'एक्स'वर माहिती दिली. मंदिरात गणरायाकडे राज्याच्या समृद्धीसाठी साकडे घातल्याचे सांगितलं. दुसरीकडे एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com