Karjat Jamkhed Assembly : कर्जत जामखेडमध्ये कोण विजयाचा गुलाल उधळणार? 'पवार विरूद्ध पवार' लढत होणार का? घ्या जाणून...,

Karjat Jamkhed Assembly Constituency Vidhan sabha Election : यंदा विधानसभा निवडणुकीक कर्जत जामखेडमध्ये विजयाचा गुलाल कोण उधळणार? याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात सध्या काय परिस्थिती आहे, ते आपण सविस्तर जाणून घेवू या.
कर्जत जामखेडमध्ये विजयाचा गुलाल कोण उधळणार?
Karjat Jamkhed AssemblySaam Tv
Published On

मुंबई : कर्जत जामखेड हा महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघ अहमदनगर जिल्ह्यांतर्गत येतो. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कर्जत-जामखेड मतदारसंघामधून महायुतीच्या इच्छूक उमेदलवारांची गर्दी दिसते आहे. महाविकास आघाडीकडून यंदा पुन्हा आमदार रोहित पवार पुन्हा मैदानात असतील. तर अजित पवार गट निवडणुकीच्या तयारी असल्यामुळे महायुतीत धुसफूस होण्याची चिन्हं आहेत.

आगामी विधानसभेची तयारीला मात्र आता सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस वेग आलाय. त्यामुळे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असणार, याकडे मात्र साऱ्यांचं लक्ष लागलेलं (Maharashtra Politics) आहे. २०१४ च्या निवडणुकीमध्ये भाजप विरूद्ध शिवसेना तर २०१९ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपमध्ये लढत रंगली होती. परंतु आता बंडखोरीनंतर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना आणि कॉंग्रेस एकत्र आले आहेत, तर महायुतीमध्ये भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार गट एकत्र लढत आहेत.

सध्या काय चित्र?

अहमदनगर जिल्ह्यात यंदा लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप विरूद्ध शरद पवार गट, असा सामना रंगला होता. यावेळी मात्र शरद पवार गटाने भाजप उमेदवाराला धूळ चारत विजयाचा गुलाल उधळला होता. निलेश लंके यांचा विजय तर सुजय विखे यांना पराभव स्विकारावा लागला (MVA Vs Mahaviakas Agahdi) होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी की महायुती? नेमकं कोण बाजी मारणार, याकडे अख्ख्या जिल्ह्याची नजर आहे.

सध्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रोहित पवार (Karjat Jamkhed Assembly Constituency) आहेत. तर मतदारसंघावर शरद पवार गटाची चर्चा आहे. त्यामुळे आगामी विधानसभेच्या रिंगणात पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडून रोहित पवार उतरतील, अशीच चिन्ह आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून कर्जत जामखेडमध्ये अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचे दौरे अन् भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे आता कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार यांच्याविरोधात जय पवार, अशी लढत होणार का? अशी चर्चा रंगली आहे. मात्र अजून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

कर्जत जामखेडमध्ये विजयाचा गुलाल कोण उधळणार?
Sangamner Constituency: संगमनेरकरांचा यंदा कौल कोणाला? थोरात आपला गड कायम राखणार की भाजप गुलाल उधळणार? घ्या जाणून

२०१९ ची विधानसभा निवडणूक

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विजयाचा गुलाल उधळला होता. कर्जत जामखेडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली ( Vidhan sabha Election) होती. शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार यांचा दणक्यात विजय झाला होता. तर भाजपचे उमेदवार राम शिंदे यांना ४३, ३४७ मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रोहित पवार १,३५,८२४ मतांनी विजयी झाले होते.

२०१४ ची विधानसभा निवडणूक

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये भाजपने विजयाचा गुलाल उधळला होता. कर्जत जामखेडमध्ये २०१४ साली झालेली भाजप आणि शिवसेनामध्ये झालेली चुरशीची लढत अख्ख्या नगरकरांनी पाहिली (Rohit Pawar Against Jai Pawar) होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे राम शंकर शिंदे ८४,०५८ मतांनी विजयी झाले होते. तर शिवसेना पक्षाचे रमेश भिवराव खाडे ३७,८१६ मतांनी पराभूत झाले होते. ऑक्टोबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होवून नोव्हेंबरमध्ये निवडणूक पार पडेल, असा अंदाज आहे. आता कर्जत जामखेडमध्ये कोण विजयाचा गुलाल उधळणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कर्जत जामखेडमध्ये विजयाचा गुलाल कोण उधळणार?
Akole Assembly constituency : अकोले मतदारसंघात कोण उधळणार विजयाचा गुलाल? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत सामना रंगणार? वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com