Sanjay Raut  Saam Digital
Maharashtra Assembly Elections

Sanjay Raut: ...पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणूका घ्या मग पाहा; संजय राऊतांचं महायुतीला थेट आव्हान

Sanjay Raut: ईव्हीएम मशीनच्या अनेक तक्रारी असून पुन्हा एकदा मतपत्रिकेवर निवडणूक घ्या असं आवाहन संजय राऊतांनी केलं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

राज्यात निवडणूकांचे निकाल लागले असून राज्यात पुन्हा एकदा भाजप सरकार येणार आहे. निकालानंतर आज शपथविधी सोहळा देखील होणार आहे. अशातच ईव्हीएम मशीनच्या अनेक तक्रारी असून पुन्हा एकदा मतपत्रिकेवर निवडणूक घ्या असं आवाहन संजय राऊतांनी केलं आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, जो मुख्यमंत्री दिल्लीतून ठरवतील तो स्विकारावा लागेल. शब्द पाळणं भारतीय जनता पक्षाची पंरपरा नाही. आता महाराष्ट्राशी वैर घ्यायचं असल्याने ते कोणतीही भूमिका घेऊ शकतात.

नाना पटोलेंना पराभवाचं जबाबदार मानलं जातंय, याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, एका व्यक्तीवर पराभवाचं खापर फोडता येत नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो. शरद पवारांसारख्या नेत्याच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र उभा असल्याचं चित्र दिसलं, त्यांनाही अपयश आलं. अपयशाची कारणं शोधली पाहिजेत. ती कारणं ईव्हीएम मशीनमध्ये आहेत, यंत्रणेच्या गैरवापरामध्ये आहेत यामधील मुख्य कारणं शोधलं पाहिजे. आम्ही तिघं एकत्र मिळून लढलो त्यामुळे हा पराभव आमच्या तिघांचा आहे.

इव्हीएम मशीनबाबत अनेक तक्रारी

डोंबिवलीमध्ये इव्हीएम मशीनचे नंबर मॅच होत नसल्याने घेतलेला आक्षेप निवडणूक आगोयाची लोकं तयार नाहीत. हे महाराष्ट्रात ठिकठिकाणी घडल्याचं समोर आलंय. याबाबत विविध बातम्या समोर आल्या आहेत. संशयाला जागा असून मोठी बाब म्हणजे आतापर्यंत शरद पवार यांनी आतापर्यंत असा संशय व्यक्त केला नव्हता.

बॅलेटपेपरवर पुन्हा निवडणूक घ्या

राऊत पुढे म्हणाले, निवडणूकांबाबत अनेक तक्रारी असून माझं म्हणणं आहे की, हा आलेला निका तसाच ठेवा आणि बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन निकाल घ्या. मग पाहूयात काय निकाल लागतो. मतपत्रिकेवर घेतलेल्या मतदानात आम्ही आघाडीवर होतो. आणि त्यानंतर तासाभरात आम्हाला जागाच मिळाली नाही, हे शक्य आहे का?

ते म्हणतात एक आहे तो सेफ आहे. याचा अर्थ जे एक आहेत त्यांना तोडायचं, त्यांच्यात मतविभागणी करायची. त्यासाठी प्रचंड पैसा, दबाव आणि यंत्रणा वापरायची आणि निवडणूका जिंकायच्या हे पंतप्रधान मोदींचं यश आहे. त्यामुळे मोदी देशाचे नेते आहेत, हे मानायला मी तयार नाही, असंही राऊत म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

Milk And Curd: दूध आणि दही एकत्र खाल्ले तर काय होते?

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

SCROLL FOR NEXT