PM Modi: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी PM मोदींचं नव्या खासदारांना आवाहन, म्हणाले...

Winter Assembly Session: संसदेत आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी नरेंद्र मोदींनी खासदारांना संबोधित केली आहे.
PM Modi
PM ModiSaam Tv
Published On

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. सकाळी ११ वाजल्यापासून अधिवेशन सुरु होणार आहे. संविधानाला ७५ वर्ष पूर्ण होणार असून २६ नोव्हेंबरला संविधान दिवसा साजरा केला जाणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी खासदारांना संबोधित केले आहे. (Parliamentary Winter Session)

नरेंद्र मोदी यांनी सांगितले की,संविधान निर्माण करताना एका एका विषयावर खूप विचार केला आहे. तेव्हा कुठे आपल्याला संविधान मिळाले आहे. संविधानातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खासदार आणि ससंद. संसदेत चांगली चर्चा होवोत. जास्तीत जास्त लोक चर्चेत योगदान देतील. दुर्दैवाने काही लोकांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी संसदेत काही लोकांना कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा उद्देश संसदेला कंट्रोलमध्ये ठेवण्याचा आहे. हे सर्व जनता पाहत आहेत. त्यामुळे त्यांना जनता शिक्षा देते.

परंतु दुदैवाची गोष्ट म्हणजे जे नवीन खासदार संसदेत येतात. त्यांना काही लोक कंट्रोलमध्ये ठेवतात. त्यांना संसदेत बोलण्याची संधीदेखील देत नाही.परंतु अनेकदा काही लोक आपल्या स्वार्थामुळे त्यांना बोलण्याची संधी देत आहे. प्रत्येक वेळी नवी पिढी संसदेत येते. त्यामुळे त्यांना स्वतः चे मुद्दे मांडण्याचा अधिकार आहे. (Winter Session)

PM Modi
Maharashtra Assembly Election Result: तुमचा आमदार कोण? २८८ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी पाहा

देशातील जनतेला आपापल्या राज्यातील सदस्यांना जास्तीत जास्त ताकद दिली आहे. त्यांनी संसदेत येऊन बोलावे, यासाठी त्यांना पुढे केले आहे. त्यामुळे आपले कर्तव्य आहे की, जनतेची अपेक्षा पूर्ण करावी. त्यांनी आपली मते मांडावी. मी विरोधी पक्षनेत्यांना सांगणार आहे की, त्यांनी संसदेत चांगले काम करावे.संसदेत काही विरोध पक्षनेत्यांना चांगले काम करायचे असते, परंतु काही लोक त्यांना ती संधी देत नाही. त्यामुळे मी सर्वांना सांगतो की, नवीन सदस्यांना बोलण्याची संधी द्या. त्यांना त्यांचे नवनवीन विचार मांडण्याची संधी द्यावी. देशातील नागरिकांची त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. त्यांच्याकडे भारताला अधिक चांगले बनवण्याची संधी आहे. त्यामुळे भारताची जनता जनता, त्यांचा लोकशाहीप्रती असलेला विश्वास, संसदेवरचा विश्वास यासाठी आपल्या सर्वांना आपले कर्तव्य पार पाडावे लागणार आहे. त्यामुळे आतापर्यंत खूप वेळा वाया गेला आहे. परंतु यापुढे संसदेत सर्व चांगल्या पद्धतीने पार पडावे.

PM Modi
Maharashtra Weather Update: थंडी वाढली! राज्यातील तापमानात आणखी घट, कसं असेल आजचं हवामान?

मी आशा करतो की, हे हिवाळी अधिवेशन खूप चांगल्या पद्धतीने पार पडावे. नवीन संसंदानासाठी खूप चांगले असावे. त्यामुळे मी नवीन सदस्यांचे स्वागत करतो. हिवाळी अधिवेशन चांगल्या पद्धतीने पार पडेन, अशी आशा मी करतो, अशा शब्दात त्यांनी खासदारांना संबोधित केले आहे.

PM Modi
Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून, २ महत्वाचे विधेयक मांडणार; विरोधात सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com