Uddhav thackeray Saam tv
Maharashtra Assembly Elections

Kalyan Politics : झालं 'कल्याण'! विधानसभेआधीच ठाकरे गटात ठिणग्या; जिल्हाप्रमुखांचं पत्र व्हायरल

Shiv Sena : शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा आज ठाकरे गटात प्रवेश होणार आहे. पण त्याआधीच स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील मतभेद समोर आले आहेत.

Namdeo Kumbhar

Kalyan Shiv Sena Politics : विधानसभा निवडणुकीआधी आयाराम-गयारामांचा पक्षप्रवेश जोरात सुरु आहे. पण त्यामुळे स्थानिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. याचाच प्रत्येय कल्याणमध्ये आलाय. शिंदेंच्या शिवसेनेतून काही कार्यकर्ते आणि नेते आज ठाकरे गटात प्रवेश करणार होते. पण याला स्थानिक नेत्यांनी विरोध दर्शवला. इतकेच काय तर याबाबत ठाकरेंना पत्र पाठवण्यात आलेय. त्यामध्ये संबंधितांना पक्षात घेऊ नका घेतल्यास, उमेदवारी देऊ नका, असे पत्रात म्हटलेय.

ठाकरे गटात कोण करणार प्रवेश ? विरोध का केला जातोय य़

शिंदे गटाचे कार्यकर्ते साईनाथ तारे हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मात्र तारे यांच्या प्रवेशाला ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला. शिंदे गटातील पदाधिकार्‍यांच्या पक्षप्रवेश झाल्यास अडीच वर्षे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या भावना दुखावतील, तारे यांना पक्षात प्रवेश देऊ नये. दिला तर एक वर्षाकरिता त्यांना पद देऊ नये. त्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत , त्यांना उमेदवारी देऊ नये,असा ठराव पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठविला आहे. ठरावाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ठाकरे गटातील युवासेनेचे जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर यांनी उद्धव ठाकरेंना पत्र पाठवले आहे .

Shiv sena

आज होणार पक्षप्रवेश -

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेची तयारी सुरू झाली आहे. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटात अनेक लोक इच्छुक आहेत. कल्याणमधील शिवसेना नगरसेविकेचे पती साईनाथ तारे यांचा मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज पक्ष प्रवेश होणार आहे. त्यांच्या प्रवेशापूर्वीच ठाकरे गटात वादंग सुरू झाला आहे. साईनाथ तारे यांच्या पक्षप्रवेशाला ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केलाय या संदर्भात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत ठराव करण्यात आलाय.

पत्रात काय म्हटलेय ?

ठाकरे गटाचे युवासेनेचे जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. त्यांचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या पत्रात साईनाथ तारे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाल्याचं म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे बूथ लावू दिले नाहीत. अशा व्यक्तीला पक्षात घेतल्यास निष्ठावंतांवर अन्याय होईल. त्याला पक्षात घेतले तर एक वर्ष त्याला कोणतेही पद दिले जाऊ नये. तसेच निवडणुकीत उमेदारीचा विचार होऊ नये, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे.

साईनाथ तारे काय म्हणाले ?

कल्याणमधील ठाकरेंच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर साईनाथ तारे यांनी याबाबत सावध प्रतिक्रिया दिली. साम टीव्हीशी बोलताना ते म्हणाले की, काही लोक नाराज असतील त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांचा गैरसमज दूर करणार आहे. मी शिंदे गटात होतो. माझा पक्षप्रवेश ठाकरे गटात होणार आहे. याबाबत कल्याणमध्ये येऊन मी प्रतिक्रिया देईल, असे तारे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसेच्या दिपोत्सवाला जाताना ठाकरे बंधूंचा एकाच कारमधून प्रवास

Raj Thackeray :...अन् राज ठाकरेंनी स्वत: हाती घेतलं कारचं 'स्टीअरिंग', दीपोत्सवातील ठाकरे बंधूंचा 'तो' व्हिडिओ चर्चेत

Saturday Horoscope: धनत्रयोदशीला 4 राशींचे भाग्य उजळणार, कामाच्या ठिकाणी बढतीचे योग, वाचा शनिवारचे राशीभविष्य

धक्कादायक! आणखी एका पोलीस कर्मचाऱ्यानं आयुष्य संपवलं, १० दिवसात ३ पोलिसांची आत्महत्या

Chhagan Bhujbal : अधिकार की लढाई में निमंत्रण नही भेजे जाते; छगन भुजबळांनी कुणावर साधला निशाणा? VIDEO

SCROLL FOR NEXT