Mira Bhayandar News: शिवसेना गल्लीत भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, नेमकं काय आहे प्रकरण? वाचा...

Rajan Pandey: भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. या हल्ल्यात भाजप जिल्हा सचिव राजन पांडे गंभीर जखमी झाले आहेत.
 शिवसेना गल्लीत भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, नेमकं काय आहे प्रकरण? वाचा...
Rajan PandeySaam Tv
Published On

महिंद्र वानखेडे, साम टीव्ही, प्रतिनिधी

मीरा भाईंदरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. या हल्ल्यात भाजप जिल्हा सचिव राजन पांडे गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी त्यांच्या पोटावर आणि मानेवर चाकू खुपसल्याची माहिती मिळत आहे. गंभीर जखमी झालेल्या राजन पांडे याना मिरारोड येथिल वॉकार्ड रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर पश्चिम येथील शिवसेना गल्लीत ही घटना घडली आहे. राजन पांडे यांना भाजपचे स्थानिक नेते रवी व्यास यांचे समर्थक म्हणून ओळखलं जातं.

 शिवसेना गल्लीत भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, नेमकं काय आहे प्रकरण? वाचा...
Explainer : वाढवण बंदराला मच्छिमारांचा का होतोय विरोध, कारणे काय? स्थानिकांचं म्हणणं वाचा

अंतर्गत वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विनोद राजभर, असं राजन पांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओत काही अनेक तरुणाच्या घोळक्यात अडकलेले राजन पांडे दिसत आहेत. हे हल्लेखोर राजन यांना घेरून त्यांना मारहाण करताना दिसत आहे.

 शिवसेना गल्लीत भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, नेमकं काय आहे प्रकरण? वाचा...
Explainer : वाढवण बंदराला मच्छिमारांचा का होतोय विरोध, कारणे काय? स्थानिकांचं म्हणणं वाचा

या तरुणांच्या हातात धारधार शस्त्र असल्याचंही दिसत आहे. या धारधार शस्त्राने ते राजन पांडे यांच्यावर हल्ला करताना या व्हिडिओत दिसत आहे. तर एक महिला त्याचा बचाव करताना पुढे येताना या व्हिडिओत दिसत आहे. एका स्थानिक मुलीने आपल्या घराच्या खडकीतून ही संपूर्ण घटना आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केली, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com