Marathi News Live Updates : अमित ठाकरे यांना धुळ्यातील ट्राफिकचा फटका

Maharashtra Breaking News Live today : आज मंगळवार दिनांक ३ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील सर्व शहराचे पावसाचे अपडेट्स, क्रीडा, मनोरंजन, बिझनेस क्षेत्रातील आजच्या ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

Amit Thackeray : अमित ठाकरे यांना धुळ्यातील ट्राफिकचा फटका

अमित ठाकरे यांना धुळ्यातील ट्राफिकचा फटका बसला. धुळ्यातील नगरपट्टी येथे मनसेच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी अमित ठाकरे पोहोचले असता त्यांना वाहतूक कोंडीचा करावा सामना लागला. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे अमित ठाकरे यांचे वाहन बराच वेळ वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याने अमित ठाकरे यांना आपल्या वाहनातच बराच वेळ बसून राहावे लागले. अमित ठाकरे यांच्या हस्ते मनसे कार्यालयाचे उद्घाटन पार पडले.

Mumbai Accident : मुंबईत भीषण अपघात, ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

मुंबईच्या लोअर परेल ब्रिजवर सिमेंट मिक्सरखाली येऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. अपघाताची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकीस्वार सिमेंट मिक्सर खाली आला. या अपघातात शैलेश शेट्टी याचा मृत्यू झाला.

Pune News : पुण्यातील २२६ मूर्ती विक्रेत्यांना नोटिसा

पुणे शहरातील २२६ मूर्ती विक्रेत्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. पुण्यात रस्ता आणि पादचारी मार्ग अडवून गणेश मूर्ती विक्रीचे दुकान थाटणाऱ्या २२६ व्यावसायिकांना पालिकेने नोटीस बजावली आहे. शिवाजीनगर घोले रस्ता रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील तीन मंडळांनी मान्यतेपेक्षा जास्त जागा व्यापल्याने त्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.

Vanraj Andekar news : वनराज आंदेकर हत्या प्रकरण : १३ जण ताम्हिणी घाटातून ताब्यात

वनराज आंदेकर हत्या प्रकरणी १३ जणांना ताम्हिणी घाटातून ताब्यात घेतलं आहे. जेवण्यासाठी हे सगळे जणं ताम्हिणी घाट परिसरात थांबले होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. जेवण झाल्यानंतर ताम्हिणी घाटातून पुढे मार्गस्थ होण्याच्या आधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. दोन दिवसांपूर्वी वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करत कोयत्याने हल्ला करण्यात आला होता.

Badlapur Case :  बदलापूर लैगिंक अत्याचार प्रकरण : आरोपी अक्षय शिंदे याला २ दिवसांची पोलीस कोठडी 

बदलापूर लैगिंक अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला दोन दिवसांची पोलीस कोठडी

दुसऱ्या चिमुकली मुलीवर अत्याचार प्रकरणी पोलिस कोठडी

अक्षय शिंदेला एसआयटीने कल्याण कोर्टात केले होते हजर

अक्षय शिंदे यांच्याकडून मोबाईल हस्तगत करायचा आहे. तसेच त्याने अन्य मुलीसोबत असा काही गैरप्रकार केला आहे याचा तपास होणार

सरकारी वकिल अश्विनी भामरे पाटील यांची माहिती

कोल्हापुरात समरजीत सिंह घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश

कोल्हापुरात समरजीत सिंह घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

Ulhasnagar News : उल्हासनगर शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांचा गोंधळ

उल्हासनगर शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाला भेटू न दिल्याने गोंधळ घातला. त्यानंतर गोंधळ घालणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Samarjeet Singh Ghatge : ठरलं! समरजीत सिंह घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश निश्चित  

कोल्हापुरातील कागल येथील गैबी चौकात राष्ट्रवादीचा भव्य मेळावा होणार आहे. यावेळी शरद पवार यांच्या उपस्थितीत समरजीत सिंह घाटगे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. गैबी चौकातील सभेत शरद पवार कोणाला लक्ष करणार? शरद पवारांच्या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष. हसन मुश्रीफांवर शरद पवार डागणार तोफ?

latur News : लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी, एका जण गेला वाहून - मंत्री गिरीश महाजन

'लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यांपैकी पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. एक जण वाहून गेला आहे. सोयाबीन आणि कापूस भाजीपाला या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मी प्रशासनाला आव्हान केलेलं आहे लवकरात लवकर पंचनामे करून शासनाला सादर करण्यात यावं, असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं.

Chhatrapati sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरात अचानक रास्ता रोको, पोलिसांची उडाली धांदल 

छत्रपती संभाजी नगरात धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचा रास्ता रोको; अचानक रस्ता रोको झाल्याने पोलिसांची ही उडाली धांदल.

मराठवाड्यातील २१ मागण्यांना घेऊ छत्रपती संभाजी नगरात उपोषण

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर आणि मराठवाड्याच्या प्रश्नासाठी उपोषण

छत्रपती संभाजी नगरातील मुख्य चौक केला जाम

चार चाकी गाड्या रस्त्यावर लावून केला मराठवाड्याच्या मागण्यांसाठी रस्ता रोको

Washim News : अडाण नदीत उडी घेतलेल्या तरुणाची मागील वीस तासापासून शोध मोहिम सुरू

वाशीमच्या शेलुबाजारात अडाण नदीत उडी घेतलेल्या तरुणाला काढण्याचं काम मागील वीस तासांपासून संत गाडगे बाबा आपत्ती पथकाच्या वतीने युद्ध पातळीवर सुरू आहे. पण आतापर्यंत यश मिळालेलं नाही.

Badlapur Case : बदलापूर अत्याचार प्रकरण : सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्याचे आदेश

बदलापूर प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी संपली.

१ ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार

याप्रकरणी सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

समिती सदस्यांमध्ये माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर, मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती साधना जाधव यांची नावे विचाराधीन

Dhule News:  सुरत लुटीच्या इतिहासाबाबत फडणवीसांना अभ्यास करण्याची गरज, माजी आमदार अनिल गोटेंची टीका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुरत लुटीच्या संदर्भात केलेल्या विधानाचा समाचार धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी घेतला असून, फडणवीस यांना अभ्यास करण्याची गरज आहे आणि महायुतीत सुरू असलेल्या अडचणींमुळे त्यांच्या डोक्यावर ताण येऊन त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं असावं असं म्हणत फडणवीस यांच्यावर गोटे यांनी टीका केली आहे,

Pune News: सरसंघचालक डॉ. भागवत घेणार जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचा पुणे जिल्ह्यात येत्या ४ ते ६ सप्टेंबर दरम्यान प्रवास आहे. येत्या गुरुवारी ५ सप्टेंबरला सकाळी ९,३० वाजता श्री क्षेत्र जेजुरी येथील अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडेरायाचे दर्शन ते घेणार आहेत. यावेळी श्री मार्तंड देव संस्थानच्या विश्वस्त मंडळातर्फे सरसंघचालक मोहन भागवत यांचे स्वागत करण्यात येईल. अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी गडावरील श्री खंडेरायाचे दर्शन ते घेणार आहेत.तसेच जेजुरी गडावरील द्वादश मल्हार दर्शन सृष्टीचे भूमिपूजन आणि कोनशिला उद्घाटन डॉ. भागवत यांच्या हस्ते होणार आहे. तसेच पुणे शहरात काही अंतर्गत बैठका आणि फक्त निमंत्रितांसाठी असणाऱ्या दोन जाहीर कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.

Akola Rain News: पूर्णा नदीला पूर, गांधीग्रामचं शिवलिंग मंदिर पाण्याखाली

अकोला आणि अमरावती जिल्ह्यात गेल्या 24 तासात पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले.. त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत.. अकोला जिल्ह्यातील पूर्णा नदीला देखील मोठा पूर आलाय.. गांधीग्राम येथील शिवलिंग मंदिर पाण्याखाली गेलेय. तर महादेव देखील अर्धे पुराच्या पाण्यात आहेत. पूर्णा नदी दुथळी भरून वाहत असल्याच हे खास दृश्य आपल्यापर्यत.. अमरावती जिल्ह्यातील पूर्णा बॅरेजचे दरवाजे उघडल्यामुळे पूर्णा नदीच्या पातळीत वाढ होत आहेत. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतरतेचा इशारा दिला आहे..

West Bengal News: पश्चिम  बंगाल विधानसभेत अत्याचारविरोधी विधेयक मंजूर

पश्चिम बंगाल विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ममता बॅनर्जी सरकार बलात्कार विरोधी विधेयक मांडले असून त्याला मंजूरी देण्यात आली आहे. बलात्काराच्या दोषींना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद या विधेयकात असणार आहे. तसेच या प्रकरणाचा तपास २१ दिवसांत पूर्ण होईल अस विधेयकात प्रावधान असेल. सरकारने या विधेयकाला अपराजिता महिला विधेयक (पश्चिम बंगाल गुन्हेगारी कायदा आणि सुधारणा) विधेयक २०२४ अस नाव दिल आहे. विधेयक मंजूर करण्यासाठी कालपासून विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आल होते.

Pune News: पुण्यामध्ये डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात, तरूणीचा जागीच मृत्यू 

पुण्यामध्ये डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये तरुणीचा जागीच मृत्यू झाला. खराडीतील दर्गा चौक परिसरातील ही घटना आहे.

Kalyan News: कल्याणमध्ये शिंदे गटाला धक्का, साईनाथ तारे ठाकरे गटात करणार प्रवेश

कल्याणमध्ये शिवसेनेला धक्का बसलाय. कल्याणमधील शिंदे गटाचा कार्यकर्ता साईनाथ तारे थोड्याच वेळात ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश करणार आहेत. साईनाथ तारे माजी नगरसेविकेचा पती आहे.

Manoj Jarange patil : मनोज जरांगे पाटील शिवाजीनगर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी समोर हजर राहणार

नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप असल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी जरांगे पाटील न्यायालयात हजर राहणार आहेत.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार कोर्टात सुनावणी होणार आहे.

छत्रपती संभाजीराजे यांच्या नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे पाटील यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी सांगितला ई गव्हर्न्सचा अर्थ

ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून कामात पारदर्शकता येते. गतीसोबतच सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम ई गव्हर्नन्समध्ये आम्ही करतोय.

ई गव्हर्नंस असल्याचा अर्थ असा नाही की केवळ टेक्नोलॉजीचा वापर करावा आणि लोकांशी भेटणं बंद करावं ( ऊद्दव ठाकरे यांना टोला )

E Governance म्हणजे एकनाथ गव्हर्नन्स यात A म्हणजे accurate अर्थात अजित पवार and D म्हणजे dedicated अर्थात देवेंद्र फडणवीस देखील जोडले गेले आहेत.

मावळ मधील एसटी कर्मचाऱ्यांचे भजन करत बेमुदत धरणे आंदोलन

राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केले आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे एसटी आगारात देखील कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. एसटी डेपोमधील मंदिरात भजन कीर्तन करत अनोख्या पध्दतीने एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने प्रवाशांचे मात्र हाल झाले आहेत.

Latest News : महाविकास आघाडीच्या जागावाटप संदर्भातील संयुक्त बैठका आता गणेशोत्सवानंतर होणार

Marathi News : महाविकास आघाडीच्या जागावाटप संदर्भातील संयुक्त बैठका आता गणेशोत्सवानंतर होणार, मुंबईच्या रखडलेल्या जागावाटपसंदर्भात आता गणेशोत्सवानंतर निर्णय होणार आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपसंदर्भातील दोन बैठका झाल्यानंतर आता पुढील बैठका या गणेशोत्सवानंतर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठका जरी गणेशोत्सवानंतर होणार असल्या तरी शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षांच्या अंतर्गत बैठका या यादरम्यान होत राहतील, त्यासोबत प्रचाराची रणनीती सुद्धा ठरवतील.

ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाची सरकारकडून दखल

वेतनवाढीच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाची सरकारकडून दखल

मंत्री उदय सामंत यांच्याकडून एसटी कामगार संघटनेला चर्चेसाठी निमंत्रण

एसटी कर्माचारी संघटेनसोबत १२ वाजता होणार बैठक

सरकारसोबत चर्चेसाठी जाण्याबाबत कर्मचार्यांमध्ये विचारविनिमय सुरू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील लवकरच एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करणार

Rain Update : नदीवरील पूल पहिल्याच पुरात वाहून गेला

Rain Update : छसंभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातिल् सारोळा येथील अजना नदीवरील पूल पहिल्याच पुरात वाहून गेला. त्यामुळे गावाचं सम्पर्क तुटला आहे. या परिसरातील महसूल मंडळत २४ तासात १६५ मिमी पाऊस पडल्याने परिसरातील सर्व नदी नाले ओसंडून वाहत आहे. अंजना नदीवरील सारोळा येथील मुख्य रस्तावरील पूल वाहून गेल्याने शाळकरी विद्यार्थी ,प्रवाशी,रुंग्नाची मोठे हाल होत आहे, या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मांगणी ग्रामस्थ करत आहे. गावकऱ्यांनी पुलाची दुरुस्ती तात्काळ न झाल्यास येण्याऱ्या विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आला.

Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीस यांचं फक्त वागण्याची पद्धत चांगली नाही - जरांगे पाटील

- ⁠सग्या सोयर्यांची अधिसुचना निघाली आहे. पण देवेंद्र फडणवीस आध्यादेश निघु देत नाही. काल परवा मला भाजपचे पाच सात आमदार भेटले होते. त्यांना मी सांगितले, आध्यादेश काढायला सांगा फडणवीसांना. ते आमदार गेले ते परत आलेच नाही.

- ⁠भाजपच्या ४० आमदारांना वाटतेय, सगे सोयरेची आधिसुचना काढावी. पण देवेंद्र फडणवीस निघु शकत नाही.

NCP Protest : अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन

राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारने तयार केलेला 'शक्ती' कायदा लवकर लागू करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने (शरदचंद्र पवार गट) आज मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं जाणार आहे. अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जाणार आहे

ST Bus Strike : मनमाड बस स्थानकात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम; प्रवाशांचे हाल

राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाचा परिणाम नाशिक जिल्ह्यातील बस स्थानकात देखील दिसून येतोय.मनमाड सह,येवला,मालेगाव,नांदगाव स्थानकातून एकही बस अद्याप बाहेर न पडल्यामुळे प्रवासी ताटकळत बसलेले आहे शिवाय बस स्थानकात देखील गर्दी कमी झाली आहे. त्यामुळे रोज बसने जाणाऱ्या कॉलेज च्या विद्यार्थ्यांना तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागला तर ग्रामीण भागातील नागरिकांना या संपाचा फटका बसलाय.

jalana Dam : जालन्यातील धामणा धरण 100 टक्के भरले,

जालना जिल्ह्यात सततच्या पावसामुळे भोकरदन तालुक्यातील धामणा धरण ओव्हरफ्लो झाले आज सकाळी सांडव्यावरून पाणी वाहत असल्याच पाहायला मिळाले,गेल्या चार वर्षात हे धरण यंदाच्या पावाळ्यात पूर्ण क्षमतेनं भरलेलं पाहायला मिळालं एकीकडे जोरदार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असलं तरी अनेक लहान मोठे प्रकल्प, सततच्या पावसामुळे ओसांडून वाहताना पाहायला मिळत आहेत

ST bus Strike : काय आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या?

- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे.

- प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक देण्यात यावा

- वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच ४८४९ कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप

- मुळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांऐवजी समान वाटप करत ५००० रुपये हजार मिळावेत

Maval News : मावळ विधानसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पडणार फूट?

मावळ तालुक्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेले आहेत. महायुती मधील भाजपने मावळ विधानसभेच्या जागेवरती दावा केला आहे. तर विद्यमान आमदार सुनील शेळके हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत. मात्र भाजप ने दावा केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांमध्येच या जागेबाबत कलगीतुरा रंगू लागला आहे. कारण मावळ विधानसभेच्या जागेवरती अजित पवार गटातीलच मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नेते बापू भेगडे यांनी देखील दावा केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मावळ विधानसभेची उमेदवारीची मागणी केली असल्याची कबुली बापू भेगडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. त्यामुळे सध्या मावळ विधानसभेच्या जागेवरती केवळ भाजपच नव्हे तर अजित पवार गटामध्ये देखील चुरस असल्याचे पाहायला मिळत आहे.

ST Bus : रत्नागिरीत शहरी तसेच ग्रामीण भागातील बससेवा सुरु

रत्नागिरीत शहरी तसेच ग्रामीण भागातील बससेवा सुरु

लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वाहतूकीवर परिणाम

परजिल्ह्यातून येणा-या गाड्या रत्नागिरीत आल्या नाहीत

दुपार नंतर रत्नागिरीतही गाड्या बंद होण्याची शक्यता

संप सुरु राहीला तर ऐन गणेशोत्सवात प्रवाशांचे मोठे हाल होऊ शकतात

रत्नागिरीतील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी...

Rain Update :वाशिममधील अडान नदीला पूर, गणेशपूर-मंगरुळपीर-कारंजा मार्ग झाला बंद 

Rain Update : वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पाऊस पावसामुळे मंगरुळपीर तालुक्यातील अडाण नदीला मोठा पूर आला आहे. अडान नदीला आलेल्या पुरामुळे गणेशपूर-मंगरुळपीर-कारंजा मार्ग बंद झालं असुन, नदीकाठच्या शेतजमिनी पूर्ण पाण्याखाली गेल्याने शेतातील पिकाच अतोनात नुकसान झालं आहे. त्यात सोयाबीन, तूर, कपाशी, तर काही शेतकऱ्यांच्या फळबागा पाण्यात गेल्या असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यामध्ये मंगरुळपिर तालुक्यातील पिंपळखुटा, मासोला, खराबी-पिंप्री, गणेशपुर, धोत्रा, घोटा, शिवणी, आदी गावांचा समावेश आहे.

Latest News : पिंपरी चिंचवड महापालिकेने ॲथलेटिक खेळाडूसाठी तयार केलेला रनिंग ट्रॅक अवघ्या दोन महिन्यांमध्ये उखडला 

पिंपरी चिंचवड महापालिकेने केलेल्या निकृष्ट कामामुळे, अवघ्या दोन महिन्यांमध्ये इंद्रायणी नगर संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुलातील ॲथलेटिक रनिंग उखडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महापालिकेच भ्रष्ट कारभार उघडकीस आल आहे. इंद्रायणी नगर येथे पिंपरी चिंचवड महापालिकेचा संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात आठ लेंनच तसेच 400 मीटर लांबीचं ॲथलेटिक रनिंग ट्रॅक आहे. या क्रीडा संकुलातील सिंथेटिक रनिंग ट्रॅकची धावपटू साठी चार कोटी रुपये खर्च करून डागडुजी करण्यात आली. मात्र अवघ्या दोन महिन्यात सिंथेटिक रनिंग ट्रॅक ची दुरावस्था झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ठेकदाराने केलेल्या निकृष्ट कामामुळे सिंथेटिक रनिग ट्रेकची दुरावस्था झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकारी आणि महापालिकेचे ठेकेदार आपसात संगणमत करून कोट्यावधीची निकृष्ट काम करत असल्याने आज सिंथेटिक रनिंग ट्रॅक ची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे आता प्रॅक्टिससाठी जायच कुठे ? असा प्रश्न ॲथलेटिक धावपटू खेळाडूंना पडला आहे.

St Bus Strike : बीडमध्ये एसटी कर्मचारी आक्रमक; एसटी सेवा पूर्णपणे ठप्प..

राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे पगार वाढ द्या, या मागणीसाठी बीडमध्ये एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत.. मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही म्हणून आज पासून बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत माघार नाही, असा पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील एसटी बस सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे..सकाळी पाच वाजल्यापासून एकही बस डेपोच्या बाहेर नाही..

पुणे : पुण्यातील तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलणार.

Pune News : पुण्यातील तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलण्यात येणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली असून, याबाबतचे गॅझेटही लवकरच प्रसिद्ध होणार आहे.

बुधवार पेठ स्थानकाचे नाव कसबा पेठ स्थानक,मंगळवार पेठ स्थानकाचे नाव आरटीओ स्थानक आणि नाशिक फाटा स्थानकाचे नाव कासारवाडी असे करण्यात येणार आहे.

तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

सिव्हिल कोर्ट स्थानकाचे नाव शिवाजीनगर जिल्हा न्यायालय करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.

Rain Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजही पावसाची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजही पावसाची शक्यता आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. सकाळी काही ठिकाणी हलकासा पाऊस झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पावसानं जोरदार हजेरी लावलीय. त्यामुळे अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकाचे नुकसान झालेलं आहे. सोबतच ओढे, नदी-नाले आता ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यातील मध्यम आणि छोटे प्रकल्प आता पूर्णतः भरलेली आहेत. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आज सकाळी 90% वर पोहोचला आहे. पाण्याची आवक वाढली तर जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. त्यासंबंधी प्रशासनाने गोदाकाच्या सर्व लोकांना तर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. सध्या अकरा हजार क्युसेक इतक्या पाण्याची आवक जायकवाडीमध्ये सुरू आहे. ती आवक वाढली आणि 95 टक्क्याच्या पुढे जर धरण जात असेल तर जायकवाडी धरणाची दरवाजे वर उचलून पाण्याचा विसर्ग केला जाईल अशी शक्यता आहे. दुसरीकडे सलग दोन दिवसांपासून सुरू असल्या जोरदार पावसामुळे कापूस, बाजरी, मका या पिकाचे मोठे नुकसान झालेला आहे. काही ठिकाणी वाहून गेली आहे. तर काही ठिकाणी पिके आडवी झाले आहेत. अनेक ठिकाणी शेतीमध्ये पाणी थांबल्यामुळे पिक वाढतील की नाही अशी भीती शेतकऱ्यांना आहे.

kolhapur News : कोल्हापूरमध्ये राजकारणाला वेग, शरद पवारांना भेटण्यासाठी नेत्यांच्या रांगा

कोल्हापुरातील पंचशील हॉटेल इथं सुरू आहे समेट, समझोता आणि खलबतं

शरद पवार यांच्या भेटीसाठी अनेक नेते पंचशील हॉटेलवर दाखल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांची मांदियाळी

कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक मतदारसंघांमध्ये नाराज, इच्छुक अशा अनेक उमेदवारांनी घेतली शरद पवार यांची भेट

वस्ताद शरद पवार नेमका कोणता डाव टाकणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

Rain Update : तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस, अनेक नद्यांना पूर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाजार सावंगी येथील धांड नदीवरच्या पुलावरून मोटरसायकलवरचे दोघे वाहून जाताना दोघांना वाचवण्यात आले. पण मोटरसायकल वाहून गेल्याची घटना घडली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत असताना पुरात मोटार सायकल घालून पुढे जाण्याचा धाडस करताना अनेकांना जीव घेणे ठरत आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील बाजार सावंगी येथी धांड नदीला पूर आला. त्यातच गावात येऊन मिळणाऱ्या निम नदी व पाडळी नदी या उपनद्यांनाही पूर आल्याने दुथडी भरून वाहत होती. धांड नदीवर जाणेफळ येथे पुलावरून मोटरसायकलस्वारन पुढे जाण्याच्या प्रयत्न केला, त्यात मोटरसायकल वर असलेले दोघेजण गाडीवरून खाली पडले.

ST bus strike : ३५ आगार पुर्णतः बंद

ST bus strike News :  ११ कामगार संघटनाच्या कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनामुळे सकाळी ८ वाजेपर्यंत २५१ आगारापैकी ३५ आगार पुर्णतः बंद आहेत. बाकीचे आगार अंशतः अथवा पुर्णतः सुरू आहेत.

मुंबई विभागात सर्व आगारातील वाहतूक सुरळीत चालू आहे. तथापि, ठाणे विभागातील कल्याण, विठ्ठलवाडी आगार पुर्णतः बंद आहेत.

विदर्भातील सर्व आगारातील वाहतूक सुरू आहे .तेथे बंद चा इतका प्रभाव दिसून येत नाही. तथापि,मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागात बहुतेक आगार बंद आहेत.

Pune News : एसटी कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातून जाणाऱ्या सर्व बस बंद आहेत. ड्रायव्हर,कंडक्टर आणि वर्कशॉप मधील जवळपास 500 च्या वर कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. पोलिस बंदोबस्त ही स्वारगेट बस स्थानकात वाढवण्यात आला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com