bacchu kadu criticizes navneet rana and bjp in achalpur  saam tv
लोकसभा २०२४

Bacchu Kadu: अमरावतीत आम्ही जिंकणार, एक्झिट पोलवर माझा विश्वास नाही: बच्चू कडू

Amravati Lok Sabha : अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवाराचा विजय होणार, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुरज मसुरकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

अमरावतीत आम्ही जिंकणार. एक्झिट पोलवर माझा विश्वास नाही. एक्झिट पोल म्हणजे थोतांड आहे, असं प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू म्हणाले आहेत. शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी मतदान संपलं. यानंतर एक्झिट पोल जाहीर झाले. ज्यात पुन्हा एकदा देशात मोदी सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. तर अमरावतीत भाजप उमेदवार नवनीत राणा या विजयी होऊ शकतात, असं सांगण्यात आलं. यावरच आपली प्रतिक्रिया देताना ते असं म्हणाले आहेत.

साम टीव्हीशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले आहेत की, ''भाजपच्याच काळात शेतकऱ्याची लूट झाली नाही, काँग्रेसच्या काळातही शेतकऱ्यांची लूट झाली. एक्झिट पोलवर माझा विश्वास नाही. हे सर्व अंदाज आहे. कोणाच्या डोक्यात काय भानामती येते आणि एक्झिट पोल जाहीर करतं त्याची गरज नाही. ४ तारखेला सर्व समजेल.''

विधानसभा निवडणुकीवर बोलताना ते म्हणाले की, ''भूमिका आम्ही काही इतक्यात जाहीर करत नाही. आमचे काही मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांना घेऊन आम्ही पंधरा ते वीस जागा आम्ही लढू. कोणासोबत जायचं की, नाही जायचं ते कार्यकर्त्यांना घेऊन ठरवू.''

भाजपच्या 400 परच्या घोषणेवर बच्चू कडू म्हणाले, ''400 पार याची चिंता नाही. शेतकऱ्याचं काय होईल याची चिंता आहे. घरकुलाचे पैसे अजून भेटले नाहीत. सरकार कोणाचं पण येऊ दे, पण शेतकरी आणि सामान्य माणसाचं भलं होऊ दे, हीच आमची मागणी आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunny Sanskari Ki Tulsi Kumari: 'याची गर्लफ्रेंड त्याची बायको...'; वरुण- जान्हवीच्या लव्हस्टोरीमध्ये कॉमेडीचा तडका

प्रायव्हेट पार्टवर २३ ठिकाणी स्टेपलर मारले, नंतर पेपर स्प्रे मारत...; कपलचे २ तरुणांसोबत भयंकर कृत्य

Maharashtra Live News Update: सांगलीमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

Sharad Pawar : 'देवाभाऊ' नेपाळमध्ये काय झालं बघा; शरद पवारांनी शेतकऱ्यांचा प्रश्नांवरून सरकारवर ओढले आसूड

Nashik Tourism: नाशिकमधील 'ही' सुंदर ठिकाणं वीकेंडसाठी ठरतील परफेक्ट पिकनिक स्पॉट, एकदा नक्की जा

SCROLL FOR NEXT